मानोरा(Washim):- नुकतेच मंत्री मंडळात समावेश झालेल्या बंजारा समाजाचे नेते कॅबिनेट मंत्री ना. संजय राठोड (Cabinet Minister Sanjay Rathore) दि. १९ डिसेंबर रोजी जिल्हा ठिकाणी वाशीम येथे प्रदीप मोरे पाटील व इतर युवकांनी प्रसार माध्यमासमोर बेताल वक्तव्य करून अपमानास्पद गरळ ओकणाऱ्या विरुध्द गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करण्यात करावी, असे निवेदन ठाणेदार यांना बंजारा समाज बांधवांच्या वतीने सुपूर्द करण्यात आले.
तात्काळ अटक करून गुन्हे दाखल करत कारवाई करण्यात यावी
निवेदनात नमूद केले आहे की, जिल्हा ठिकाणी वाशीम येथे प्रदीप मोरे पाटील व इतर युवकांनी बंजारा समाजाचे नेते कॅबिनेट मंत्री ना. संजय राठोड यांना जिल्हयात पाय ठेवू देणार नाही. अशी धमकी दिली. तसेच आक्षेपार्ह विधान करून बदनामी व सामजिक भावना दुखावल्या. एका संविधानिक पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीवर बेताल वक्तव्य करणाऱ्या विरोधात वेळीच आवर न घातल्यामुळे बंजारा समाजात सामाजिक असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे वरील सदर व्यक्ती विरोधात तात्काळ गुन्हे दाखल करून अटक करण्यात यावी, असे निवेदन ठाणेदार यांना दिले आहे. निवेदन देतेवेळी मॉन्टी महाराज राठोड, श्याम राठोड, उमेश चव्हाण, अनिल राठोड, संजय राठोड, आशिष राठोड, तुषार राठोड, रामेश्वर चव्हाण यांच्यासह इतर युवक उपस्थित होते.