मानोरा(Washim):- नोव्हेंबर महिन्यात राज्यात विधानसभा निवडणूक जवळपास आता निश्चित झालेले आहे. त्या अनुषंगाने इच्छुक उमेदवारांनी मोर्चे बांधणी चालविलेली आहे, दरम्यान गेल्या काही काळापासून कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघात (Assembly constituencies) लोकाभिमुख उपक्रम राबविनारे रा. कॉ शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. श्याम जाधव(नाईक) यांना रा. कॉ पक्षाने उमेदवारी द्यावी अशी चर्चा गावोगावी मतदारात चाललेली आहे.
मतदार संघातील मतदारांत चर्चा
कारंजा – मानोरा विधानसभा मतदार संघ रा. कॉ शरदचंद्र पवार पक्षाला सुटण्याची दाट शक्यता असून पक्ष प्रमुख खा. शरदचंद्र पवार हा मतदार संघ हातातून जाऊ देणार नाहीत.कारण २००९ च्या निवडणुकीत या मतदार संघातून दिवंगत प्रकाश डहाके निवडून आलेले आहेत. त्यानंतर २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत रा.कॉ पक्षाने दुसऱ्या स्थानावर आपली बाजू कायम ठेवली. ही बाब लक्षात घेता हा मतदार संघ महाविकास आघाडीतील घटक पक्ष रा.कॉ शरदचंद्र पवार यांच्या कडेच राहील अशी चर्चा जनसामान्य नागरिकांत रंगत आहे. त्याचप्रमाणे गावोगावी जनसामान्यांच्या हिताचे ‘आरोग्य आपल्यादारी’ मोफत आरोग्य तपासणी सारखे अन्य लोकाभिमुख स्तुत्य उपक्रम राबविणारे उच्च विद्या विभुषित स्त्री रोग तज्ञ तथा रा. कॉ पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ.श्याम जाधव (नाईक) यांना पक्ष श्रेष्ठिने उमेदवारी द्यावी अशी देखील नागरिक मतदारामध्ये चर्चेला उधाण आहे.