कारंजा (Washim):- मानोरा रस्त्यावरील गिर्डा फाट्याजवळ एका ट्रॅक्टरने मोटारसायकलला समोरासमोर जोरदार धडक दिली. ही घटना १८ ऑगस्ट रोजी दुपारी घडली. या घटनेत मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला आहे. महेश श्रीकृष्ण आखूड (रा. दापुरा ता. मानोरा) असे मृतकाचे नाव आहे.
चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून मोटारसायकलला दिली धडक
कारंजा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ट्रॅक्टर (Tractor)चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून मोटारसायकलला धडक दिली. ज्यामध्ये महेश आखूड यांचा मृत्यू(Death) झाला. यानंतर आरोपी ट्रॅक्टर घटनास्थळी सोडून तेथून पसार झाला. याप्रकरणी लक्ष्मण श्रीकृष्ण आखूड ( ५०, रा. दापुरा ता. मानोरा) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी ट्रॅक्टर चालक राहुल गाणी गोडाले ( रा.वाल्मीक नगर कारंजा) याच्या विरुद्ध कलम १०६(१), २८१ भारतीय न्याय संहिता २०२३, सहकलम १८५, १३४ (ए) मोवाका नुसार गुन्हा दाखल केला आहे.