Manora:- मंत्रालय, मुंबई येथे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (Pradhan Mantri Krishi Sanchan Yojana) – पाणलोट विकास घटक २.० या योजनेंतर्गत ” पाणलोट यात्रा” आयोजित करण्याबाबत बैठक राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
बैठक राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली
यावेळी नियोजनाबाबत विभागाच्या अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या. तसेच मृद व जलसंधारण विभागाच्या (Department of Water Conservation) वतीने पुढील १०० दिवसाचा आराखडा देखील यावेळी सादर करण्यात आला. कृषि सिंचनासाठी पाण्याची साठवण क्षमता वाढविण्यासाठी विभागाने योजनांना गती देऊन प्रकल्प वेळेत पूर्ण करावे, असे निर्देश ना. संजय राठोड यांनी दिले. या बैठकीला राज्यमंत्री ना. संजय राठोड यांच्यासह मृद व जलसंधारण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.




