मानोरा(Washim):- शहरातील वसंत नगर मानोरा येथील जय भोले कावड मंडळ व बाल कावड मंडळ यात्रा चवथ्या श्रावण सोमवारी दि. २६ ऑगस्ट रोजी काढण्यात आली. या कावड यात्रेत(Kawad Yatra) हजारो शिव भक्त सहभागी झाले होते. शहरातील अरुणावती नदी पात्रातून कावड मध्ये तिर्थ पवित्र जल भरल्यानंतर गणेश मंदीरावरून शहरात कावड यात्रा मार्गक्रमण करीत असताना हर हर महादेवाच्या जयघोषाने मानोरा नगरी दुमदुमून गेली होती.
मानोरा शहरातून कावड यात्रेला प्रारंभ
तालुका ठिकाण मानोरा शहरातून कावड यात्रेला प्रारंभ झाला. अरुणावती नदी पात्रातून कावड मध्ये जल भरून नदी काठी वसलेल्या गणपती मंदीर व बालाजी मंदिर, संतोषी मातेची पूजा अर्चा करून शहरातील दिग्रस चौक, शिवाजी महाराज चौक आणि संत सेवालाल महाराज चौक मार्गे शहरातील राठीनगर, नाईक नगर व वसंत नगर कावड यात्रा विठोली येथील शिव पार्वती मंदिराकडे वाजत गाजत निघालेल्या कावड यात्रेत शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले. शहरातून कावड यात्रा भगवान शिव शंकर यांची मुर्तीसह विविध पथक, पारंपारिक वाद्य व जय भोलेनाथ, हर हर महादेवाच्य जयघोषाने शिवभक्त भक्तीमय वातावरणात रवाना झाली. यावेळी कावड यात्रेचे ठिकठिकाणी शिव भक्तांनी जल्लोषात स्वागत (Welcome to cheers)करून चहा, पाणी, नाश्ता व फरालाची व्यवस्था केली होती.
दरम्यान कावड यात्रेत हजारो शिवभक्तांनी सहभाग घेतला. त्यानंतर शिव भक्तांनी महाआरती, पूजा करून कावड मधील पवित्र तिर्थ जल भगवान शिव शंकर, देवी पार्वतीच्या चरणी अर्पण करून बळीराजा सुख शांती दे, पाऊस पडू दे, अशी हजारो शिव भक्तांनी प्रार्थना केली. यावेळी पोलीसांनी कडेकोट चोख बंदोबस्त होता.