मानोरा (Washim):- मानोरा पोलीस स्टेशन (Police Station) अंतर्गत येत असलेल्या तळप बु येथे महिलांनी गावात दारूबंदी व जुगार व मटका बंद करण्यासाठी गावांमध्ये मिरवणूक काढून जनजागृती केली.
गावफेरी काढून राग राघीणीनी केली जनजागृती
सविस्तर असे की, गावात गावठी, देशी दारु (country liquor)सह बेकायदा वरली मटका, फटका आदी अवैध व्यवसाय (illegal business) फोफावल्याने अनेकांचे संसार उघड्यावर येत आहे. सदरील राजरोसपणे खुलेआम सुरू असलेले अवैध व्यवसायाला त्वरीत आळा बसावा, यासाठी ग्राम पंचायतचा सहारा घेत महिलांनी आक्रमक भूमिका घेत गाव फेरी घालून अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी पुढाकार घेऊन अवैध धंदे करणाऱ्यांना चेतावणी देत जनजागृती केली. त्यानंतर महिलांनी ग्राम पंचायत मध्ये सभा घेतली. यावेळी गावातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.