मानोरा(Washim):- नगर पंचायतची(Nagar Panchayat) नवीन इमारत तयार होवून दीड वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटला, तरी पण जुन्याच इमारतीत नगर पंचायतचे कामकाज सुरू असल्याने नवीन इमारतीचा लोकार्पण (public offering) कधी होणार याची प्रतिक्षा करावी लागत आहे.
नवीन इमारत रोडवर न घेता शासकीय विश्राम गृहाच्या बाजूला मोकळ्या जागेत
करोडो रुपये खर्च करून मानोरा नगर पंचायतची नवीन इमारत तयार करण्यात आली आहे. येथे सर्व विभागासाठी वेगवेगळी व्यवस्था आहे. नवीन इमारत रोडवर न घेता शासकीय विश्राम गृहाच्या (rest house) बाजूला मोकळ्या जागेत बांधण्यात आली आहे. शहरातील एकांत भागात बांधण्यात आलेल्या नवीन इमारतीत जुनी नगर पंचायत हलविण्यात येण्याची मागणी शहरवाशी नागरीक करत आहे.
जुन्याच इमारतीत कामकाज सुरू
मानोरा नगर पंचायतची जुनी इमारत मानोरा – दिग्रस राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्यावर अपुऱ्या जागेत आहे. रोडवर कार्यालय असल्याने वाहनांचा आवाज येतो. महीला पदाधिकाऱ्यांना लघू शंकेची व्यवस्था नाही. बसण्यास पुरेसे कार्यालय नाही. जुन्या इमारतींची स्थिती व्यवस्थित नसतानाही शासन व प्रशासन नवीन इमारतीचे लोकार्पण करण्यासाठी सरसावत नाही.