मानोरा (Washim):- रेशन कार्डमध्ये समाविष्ट सदस्यांची ई – केवायसी करण्यासाठी शासनाने अंतिम मुदत ३१ ऑक्टोंबर केली होती, त्यानुसार दिवसभर ई – केवासी (E-KYC)करण्यासाठी रास्त भाव दुकानात गर्दी केली होती.
शासन प्रणाली अंतर्गत धान्य वाटप पारदर्शक करण्यावर पुरवठा विभागाचा भर
शासन प्रणाली अंतर्गत धान्य वाटप पारदर्शक करण्यावर पुरवठा विभागाचा भर आहे. त्या अनुषंगाने मागील काही महिन्यापासून रास्त भाव धान्य दुकानावर रेशन कार्डमधील सर्व समाविष्ट सदस्यांची ऑनलाईन पध्दतीने ई – पॉस मशीनवर (E-POS Machine) अंगठ्याचा थंब देवून ई – केवाय सी करण्याची प्रकिया सुरू आहे. शासनाने आधार प्रमाणीकरण करून ई – केवायसी करणे बंधनकारक केले आहे. यासाठी ३१ ऑक्टोंबर ही अंतिम तारीख आधार जोडणीची दिलेली होती. त्यानुसार रेशन कार्डमधील अनेक सदस्यांनी दिवसभर ई – केवायसी करण्यासाठी रेशन दुकानावर एकच गर्दी केली होती.