Washim :- कालकथित तुळशिरामजी किसन सुर्वे यांचे सुपुत्र नायक अमोल तुळशीराम सुर्वे भारतीय लष्करातील 14 महार रेजिमेंट मध्ये अभिमानास्पद 20 वर्ष सेवा बजावली असुन यांच्या सेवापुर्ती सोहळ्या निमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन त्रिदीप माजी सैनिक संघटना, रमाई महिला मंडळ समता नगर व जयभिम तरुण उत्साही मंडळ यांच्यातर्फे करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात भव्य रॅलीने झाली, यामध्ये नागरिक, माजी सैनिक व लष्करी अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. या रॅलीदरम्यान (Rally) महामानवाच्या पुतळ्यांना हारअर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले
रॅलीदरम्यान महामानवाच्या पुतळ्यांना हारअर्पण करून त्यांना अभिवादन
यामध्ये नायक अमोल तुळशीराम सुर्वे यांचा सपत्नीक व आईचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सुर्वे परिवारा कडून माजी सैनिकांचा देखील शाल आणि वृक्षारोपणासाठी रोपे देऊन गौरव करण्यात आला. पर्यावरण संरक्षणाच्या संदेशासह वृक्षारोपणाचा संकल्प यावेळी करण्यात आला. या सोहळ्यास लष्करी अधिकारी, स्थानिक नागरिक व प्रतिष्ठित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सैनिक संतोष वानखेडे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. महेंद्र भगत यांनी केले. तसेच कार्यक्रमामध्ये मनोगत माजी सैनिक अध्यक्ष दिपक ढोले यांनी सैनिकांची सेनेत असताना कुठल्या परिस्थितशी सामना करत जीवन जगावे लागते याची मांडणी केली.
माजी सैनिक रमेश भगत, शंकर मुळे, वैजनाथ बनसोड, सिद्धार्थ मोरे, कान्हू गायकवाड, मारोती खंदारे, विक्रांत घुगे, संजय पवार, मोतीरामजी बनसोड, काशिनाथ भिसे, सिद्धार्थ भगत आदींनी त्यांचे मनोगत व्यक्त केले जेष्ठ समाजसेविका प्रतिभा ताई सोनोने यांनी सुर्वे परिवारा बद्दल विस्तृत माहिती दिली.उपस्थितांनी नायक अमोल सुर्वे यांच्या 20 वर्षांच्या समर्पित सेवेबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले