आघाडीकडून उमेदवारी अन निवडणूक निशाणी तुतारी
वसमत/हिंगोली (Wasmat Assembly) : वसमत येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर (Jaiprakash Dandegaonkar) यांनी कार्यकर्त्यानी आग्रह केल्यामुळे कार्यकर्त्यांचा शब्दाचा मान ठेवतो असे म्हणत विधानसभा निवडणूक लढवन्यासाठी होकार दिला आहे त्यामुळे वसमत विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून दांडेगावकर हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार असतील व त्यांची (Wasmat Assembly) निवडणुक निशाणी तुतारी असेल हे स्पष्ट झाले आहे त्यांच्या घोषणेमुळे वसमत मतदारसंघातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.
वसमत येथे मयूर मंगल कार्यालयात बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार ) पक्षाचा कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला या मेळाव्यासाठी (Jaiprakash Dandegaonkar) माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण,उमेश देशमुख,अंबादासराव भोसले,माजी आमदार पंडितराव देशमुख ,ॲड रामचंद्र बागल,सुमित्रा टाले,सुभाष लालपोतू,विनोद झंवर, यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी अनेक पदाधिकाऱ्यांच्या जाहीर करून त्यांना नियुक्तीपत्र दिले. वसमत विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आघाडीचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवावी अशी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी यांची इच्छा होती.
मात्र आजपर्यंत जयप्रकाश दांडेगावकर यांनी निवडणूक लढवण्यासंदर्भात जाहीर वक्तव्य किंवा कबुली दिली नव्हती या पार्श्वभूमीवर (Wasmat Assembly) वसमत येथे बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता संवाद मेळावा घेण्यात आला मेळाव्यासाठी विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक भागातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते हजर होते मेळाव्यात उपस्थित प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपल्या मनोगतात दांडेगावकर यांनी विधानसभा निवडणूक लढवावी अशी जोरदार मागणी केली सर्व पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले यावेळी बोलताना त्यांनी मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी तरुण पिढीला संधी द्यावी असे आवाहन केले होते त्यांच्या आवाहनानुसार आपण थांबलो होतो व तरुण कार्यकर्त्याला संधी दिली होती असे त्यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसापासून मतदारसंघातील कार्यकर्ते व पदाधिकारी हे (Wasmat Assembly) निवडणूक लढवण्यासंदर्भात आग्रह करत आहेत यांचा आग्रह व आजच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात कार्यकर्त्यांचा आग्रह पाहता आपण कार्यकर्त्यांचा मान ठेवतो असे सांगितले म्हणजेच निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे त्यांनी जाहीर केले दांडेगावकर यांनी निवडणूक लढवण्याचे जाहीर करताच उपस्थीत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. दांडेगावकर यांच्या आजच्या घोषणेमुळे वसमत विधानसभा मतदारसंघात जयप्रकाश दांडेगावकर हे आघाडीचे उमेदवार राहतील यावर शिक्कामोर्तब झाले आहे महाविकास आघाडीच्या वतीने जयप्रकाश दांडेगावकर हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राहतील व त्यांची निशाणी तुतारी राहील हे स्पष्ट झाले आहे.
वसमत विधानसभा (Wasmat Assembly) मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी होकार दिल्यामुळे आता जयप्रकाश दांडेगावकर विरुद्ध आमदार राजू पाटील नवघरे यांच्यात आमने सामने लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे महाविकास आघाडी कडून जयप्रकाश दांडेगावकर व महायुतीकडून राजू पाटील नवघरे हे मैदानात राहतील अशी शक्यता वाढली आहे निवडणुका जाहीर होईपर्यंत अजून काय काय घडामोडी होतात महायुती व महाआघाडी कायम राहते की नाही राष्ट्रवादी अजित पवार गट महायुती सोबत राहतो का नाही , हे अजून स्पष्ट नाही त्यामुळे मैदानात अजून कोण कोण राहतात अजून कोण नवीन चेहरे उमेदवार म्हणून समोर येतात हे निवडणुका जाहीर झाल्यानंतर समजणार आहे मात्र जयप्रकाश दांडेगावकर व राजू पाटील नवघरे हे आमने-सामने राहतील यावर आज शिक्कामोर्तब झाले आहे.