वसमत (Wasmat Assembly) : सध्या विधान सभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडण्याकरीता पोलीस प्रशासन प्रयत्नशिल आहे. परंतु काही जण शांततेला बाधक ठरत असल्याने उपविभागीय दंडाधिकारी विकास माने यांनी वसमत व औंढा नागनाथ तालुक्यातील आठ जणांना हद्दपार करण्या बाबतचे आदेश काढले.
वसमत विधानसभा मतदार संघाची (Wasmat Assembly) घोषणा झाल्या नंतर आदर्श आचार संहिता लागु करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी शांततेला बाधक ठरणार्या आठ जणांवर हद्दपारीचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी विकास माने यांनी काढले आहे. ज्यामध्ये भल्ला उर्पेâ सुखदेव रामकिसन कोकाटे रा. मुर्तीजापुर सावंगी ता.औंढा ना., आकाश देवराज धुतराज रा. हट्टा, जनाथ तुकाराम चव्हाण रा.कोर्टा, रघुविरसिंग गुरूमुखसिंग चव्हाण रा.रेल्वे स्टेशन रोड वसमत, मुकेश भुजंग रसाळ रा. असोला ढोबळे ता.औंढा ना., शिवा यल्लापा गुंडाळे, बाबा नागोराव गोरे रा. वडरवाडा कारखाना रोड वसमत, गजानन बालाजी भोसले रा. आंबा चौंडी ता.वसमत या आठ जणांचा समावेश आहे. आणखी काही जण हद्दपारीच्या रडारवर आहेत.