वसमत (Wasmat Attack) : येथे मंगळवारी मध्यरात्री वाहनांवर दगडफेक करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाला यात दोन कारचालकांना अडवून दगडफेक केली यात कारचे नुकसान झाले एका दुचाकीवरही दगडफेक केल्याची घटना घडली या प्रकाराने कितीचे वातावरण निर्माण झाले होते याप्रकरणी वसमत शहर पोलिसांनी तीन जनाविरोधात विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
मंगळवारी मध्यरात्री एकच्या सुमारास वसमत येथील गणेश शहागंटवार हे त्यांच्या मित्रासह रात्री हिंगोली हुन वसमत कडे येत होते त्यांच्या मागे शेख अफरोज यांची कार होती. या (Wasmat Attack) दोन्ही कार टोळक्याने अडवल्या तिथे जमलेल्या चार-पाच जणांच्या टोळक्याने कार थांबवली व कारवर तुफान दगडफेक केली. काही समजण्याच्या आत कारच्या काचांचा चुराडा झाला. यात गणेश शहागंटवार जखमी झाले आहेत.
याप्रकरणी वसमत शहर पोलिसांना (Wasmat Attack) माहिती देताच शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी महाजन व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोघ जणांना ताब्यात घेतले तिघे फरार झाले आहेत. याप्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात नरेश भिसे, भीमराव नंदनवरे, अरविंद साळवे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दगडफेक करण्याचे कारण मात्र समजले नाही. (Wasmat Attack) याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी महाजन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वसमत बंदच्या घटनेचा व या दगडफेकीच्या घटनेचा काही संबंध नाही टोळक्याने विनाकारण दहशत निर्माण करण्याचे उद्देशाने हा प्रकार केला असल्याचे त्यांनी सांगितले.