दीड लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास
वसमत (Wasmat Burglary) : वसमत येथील स्वानंद कॉलनी भागात दरवाजाचे कुलूप कोंडा करून चोरट्याने घरातील सोन्या चांदीचे दागिने लंपास केले घराला कुलूप लावून बाहेरगावी गेल्याचा फायदा चोरट्याने उचलून एक लाख बेचाळीस हजार 916 रुपयांचा ऐवज लांबवला याप्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंदवला आहे.
वसमत येथील स्वानंद कॉलनी भागात राहणारे मारोती मलीकार्जुन स्वामी,व त्यांचे कुटुंबीय दोन नोव्हेंबर रोजी घराला कुलूप लावून मुलीच्या शिक्षणाची फी भरण्यासाठी नगर येथे गेले होते घराला कुलूप असल्याचे पाहून चोरट्यांनी डल्ला मारला व घराचा कुलूप कोंडा तोडून घरातील ऐवजी लांबवला तीन नोव्हेंबर रोजी मारुती स्वामी व कुटुंबीय परत आले असता त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले त्यांनी तात्काळ वसमत शहर पोलिसांना पाचारण केले घटनास्थळी पोलीस निरीक्षक सुधीर वाघ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मिराशे व पथक दाखल झाले पाहणी व पंचनामा करण्यात आला.
या घटनेचा चोरट्याने कुरूप कोंडा तोडून घरात प्रवेश केला व (Wasmat Burglary) घरातील कपाटात असलेले चांदीचे जोडवे,सोन्याचे झुमका जोड,सोन्याच्या काड्या , सोन्याचे 20 मनी, तीन ग्राम वजनाची सोन्याची अंगठी, सोन्याचे मनी मंगळसुत्र, सोन्याचे मंगळसुत्र दोन नग , 15 ग्राम वजनाचे सोन्याचे नेकलेस, असा एकुण 28.37 ग्रॅम सोन्याचे दागिने व 53.30 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने चोरून नेले आहेत याप्रकरणी मारुती स्वामी यांच्या तक्रारीवरून एक लाख 42 हजार 916 चे सोन्या-चांदीचे दागिने चोरीस गेल्याप्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कसबेवाड सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मिराशे करत आहेत.




