आ. राजू पाटील नवघरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे केलेल्या पाठपुराव्याला मिळाले यश
वसमत (Wasmat City Bypass) : वसमत शहराला बायपास मिळवून देणारचअसा शब्द दिल्यापासून आमदार राजू पाटील नवघरे (MLA Raju Patil Navaghre) यांनी केंद्रीय मंत्री (Nitin Gadkari) नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता अखेर या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वसमत मधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 ला वळण रस्ता मंजूर केला आहे. (Wasmat City Bypass) वसमतच्या बायपास वर 20 जून रोजी शिक्कामोर्तब झाले आहे. बायपास मंजूर झाल्याचे वृत्त समजल्यापासून वसमतकरांनी आमदार राजू पाटील नवघरे यांचे अभिनंदन करणे सुरू केले आहे.
वसमत शहर झपाट्याने वाढत आहे उद्योग व्यवसाय शैक्षणिक संस्था शेती व्यवसाय यासह अनेक कारखाने यामुळे शहराचा सर्वांगीण विकास होत आहे. वसमत शहरातून राष्ट्रीय महामार्ग जात आहे शहराच्या मध्यभागातून राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने शहराचे दोन भाग होत आहेत. रस्त्यावर प्रचंड वाहतूक आहे त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर बायपास असावा, अशी मागणी अनेक वर्षापासून होती. मात्र लोकप्रतिनिधींनी या मागणीकडे आजवर लक्ष दिले नव्हते आमदार राजू पाटील नवघरे यांनी मात्र (Wasmat City Bypass) वसमत शहराला बायपास पाहिजे आहे आणि आपण तो मिळवू असा शब्द वसमतकरांना दिला होता बायपास मिळवून देणार असल्याचा शब्द दिल्यापासून आमदार राजू पाटील नवघरे (MLA Raju Patil Navaghre) यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला होता.
त्यांच्या पाठपुराला यश मिळाले असून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी या महत्त्वपूर्ण प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 वर वसमत शहराला बायपास देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता वसमतचा चोहो बाजूने झपाट्याने विस्तार व विकास होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आमदार राजू पाटील नवघरे यांनी वसमतकरांसाठी ही मोठी यशस्वी लढाई जिंकली असल्याच्या भावना वसमतकरांनी व्यक्त केल्या आहेत.
आमदार राजू पाटील नवघरे यांनी वसमत शहराच्या विकासासाठी कल्पक आणि दूरदृष्टीचा कार्यक्रम हाती घेतला.यामध्ये वसमत शहराची तहान भागवणारी मात्र बंद पाडलेली बंद पाडलेली सती पांगरा पाणीपुरवठा योजना प्रारंभ करून शहराची पाणी समस्या कायमची मिटवलेली आहे. (Wasmat City Bypass) वसमत शहराचे नियोजनबद्ध विकास व्हावा या उद्देशाने रस्त्यांची दुरुस्ती, मलनिस्सारण व्यवस्था, तिरंगा लाईट, हाय-मास्ट दिवेआणि शहरातील मूलभूत सुविधा पुरवण्याकडे त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे वाढत्या लोकसंख्येमुळे वाहतुकीवर येणारा ताण, वारंवार होणारी ट्रॅफिक जाम यामुळे नागरिक त्रस्त होते.
यावर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याकडे वसमत शहरात बायपास (Wasmat City Bypass) मिळावा यासाठी पाठपुरावा केला आणि अखेर वसमत शहरासाठी बायपास रस्ता मंजूर झाला आहे. या वळण रस्त्यामुळे शहरातील वाहतुकीची समस्या, वाहतूक कोंडीपासून मोठा दिलासा मिळणार आहे. आमदार राजू पाटील नवघरे (MLA Raju Patil Navaghre) यांनी मंजूर करून घेतलेल्या या बायपासमुळेनागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
या संदर्भात आमदार राजू पाटील नवघरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वसमतकरांनी शब्द दिला होता. वसमतच्या रहदारीचा प्रश्न कायमचा मिटवण्यासाठी बायपास मंजूर करून घेईल असा शब्द दिला होता. वसमतकरांच्या खंबीर पाठिंब्यामुळे हा प्रश्न केंद्रीय मंत्र्यांसमोर समर्थपणे मांडता आला आणि बायपास मंजूर झाला आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वसमतच्या प्रश्नासाठी वेळ दिला आणि बायपास रस्ता मंजूर करून दिला आहे.
वसमत शहरातील नागरिकांना चांगले सुंदर शहर देण्याची आपली योजना आहे. त्यातील हा एक महत्त्वाचा टप्पा होता लवकरच बायपास चे काम सुरू होईल आणि सोबतच शहरात अंडरग्राउंड गटारी व्यवस्था अंडरग्राउंड केबल इत्यादी कामेही युद्ध पातळीवर सुरू होणार असल्याचे (MLA Raju Patil Navaghre) आमदार नवघरे यांनी देशोन्नतीशी बोलताना सांगितले