पोलीस ठाणे ते कारंजा चौक रस्ता झाला मोकळा
वसमत (Wasmat Encroachments) : वसमत शहरातील रहदारीला अडथळा करणारे अतिक्रमण हटवण्यास नगरपालिका प्रशासनाने सुरुवात केली आहे गुरुवारी ही मोहीम सुरू करण्यात आली पहिल्या दिवशी पोलीस ठाणे ते कारंजा चौक या रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात झाली आहे अतिक्रमण काढणार असल्याचे समजतात अतिक्रमणधारकांनी स्वतः होऊन अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केल्याने ही मोहीम सुरळीत झाली शहरातील सर्व अतिक्रमण हटवणार असल्याचे मुख्याधिकारी निलेश सुंकेवार यांनी सांगितले.
वसमत शहरात (Wasmat Encroachments) मुख्य रस्त्यांवर हातगाडे भाजीपाला विक्रेते दुचाकी दुकानांच्या ओट्यांवरील दुकाने दुकानातील सामानांच्या रस्त्यावर उतरंडी यामुळे रहदारीला त्रास होत होता पोलीस ठाणे ते कारंजा चौक या रस्त्यांवर तर अतिक्रमणाचा कहर झाला होता त्यामुळे पायी चालणेही अवघड झाले होते यासंदर्भात शहरातील नागरिक व्यापारी पत्रकार यांनी तहसीलदारांना निवेदन दिले होते त्यानंतर तहसीलदार शारदा दळवी यांनी पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे मुख्याधिकारी निलेश सुंकेवार यांच्यासह शहरात फेरफटका मारून अतिक्रमणाची पाहणी केली होती व तातडीने (Wasmat Encroachments) अतिक्रमण हटवून रस्ते रहदारी मोकळे करून घेण्याच्या सूचना तहसीलदार शारदा दळवी यांनी नगरपालिका प्रशासनला केल्या होत्या त्यानुसार गुरुवारी मुख्याधिकारी निलेश सुंकेवार यांनी पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली.
दरम्यान मोहीम सुरू होणार असल्याने बुधवारी रात्रीपासूनच कारंजा चौक ते पोलीस ठाणे या रस्त्यावर असलेल्या फळ विक्रेते भाजीपाला विक्रेत्या दुकानदारांनी स्वतः होऊन रस्त्यावरील दुकाने हटवण्यास सुरुवात केली होती सकाळी अतिक्रमण मोहीम सुरू झाल्यानंतर उर्वरित (Wasmat Encroachments) अतिक्रमणे काढण्यात आली सायंकाळी उशिरापर्यंत ही मोहीम सुरू होती पहिल्या दिवशी कारंजा चौक ते पोलीस ठाणे हा रस्ता रहदारीसाठी मोकळा करण्यात आला पहिल्यांदाच या रस्त्यावरील सर्व अतिक्रमण हटल्याने हा रस्ता मोकळा श्वास घेत आहे.
ही मोहीम सुरूच राहणार आहे असे मुख्याधिकाऱ्यांनी जाहीर केले शुक्रवारी झेंडा चौक ते मामा चौक या रस्त्यावर मोहीम राबवली जाणार आहे या रस्त्यावर असलेल्या व्यापाऱ्यांच्या ओट्यावर किरायाने इतर दुकाने भाड्याने देण्याचे प्रकार आहेत दुकानदारांच्या ओट्यावर भाडेकरू असल्याने रहदारीसाठी रस्ता मोकळा राहत नाही सोबतच व्यापाऱ्यांच्या दुकानाच्या बाहेर सामानाच्या उतरंडी आहेत त्यामुळे व्यापाऱ्यांच्या दुकानाच्या बाहेर असलेल्या सामानाच्या उतरंडीवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी निलेश सुंकेवार यांनी सांगितले.
शहरातील सर्व (Wasmat Encroachments) अतिक्रमण हटवल्याशिवाय ही मोहीम बंद होणार नाही असे त्यांनी सांगितले वसमत येथील कारंजा चौक ते पोलीस ठाणे हा रस्ता मोकळा करण्यात प्रशासनाला यश आले आहे आता पोलीस ठाणे ते ठक्कर कॉम्प्लेक्स या रस्त्यावरील दोन्ही बाजूच्या फुटपाथ वरील सर्व अतिक्रमण हटवावे लागणार आहे तसेच झेंडा चौक ते मामा चौक पोलीस ठाणे ते झेंडा चौक कारंजा चौक ते मामा चौक या मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण हटवून रस्ते रहदारीसाठी मोकळे करून घेण्याची मोहीम राबवण्यात येणार आहे.
अतिक्रमण (Wasmat Encroachments) हटवल्यानंतर शहरात कायम नगरपालिकेचे पथक फिरवून रस्त्यावर अडथळा करणाऱ्या अतिक्रमण धारकांच्या विरोधात कायम मोहीम सुरू राहील असे मुख्याधिकारी निलेश सुंकेवार यांनी देशोन्नतीशी बोलताना सांगितले. पोलीस बंदोबस्तात सुरू झालेल्या या मोहिमेत नगरपालिकेचे स्वच्छता विभागाचे कर्मचारी नगरपालिका अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते रस्त्यावर असलेल्या भाजीपाला व फळ विक्रेत्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले त्यामुळे विक्री त्यांना धीर आला आहे.