तीन दिवसाच्या पोलीस कोठडीत रवानगी
वसमत (Wasmat police) : वसमत परभणी रस्त्यावर थोरावा पाटी ते खांडेगाव रस्त्यावर वाहनधारकांना अडवून लूटण्याच्या घटना घडत आहेत या पार्श्वभूमीवर वसमत ग्रामीण पोलिसांनी तीन जणांना जेरबंद केले आहे अटक केलेल्या तिघांना गुरुवारी न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे या रस्त्यावर लुटमारीच्या अनेक घटना घडत असल्याच्या तक्रारी आहेत. (Wasmat police ग्रामीण पोलिसांनी चोरट्यांना जेरबंद केल्याने या घटनांना आळा बसण्याची शक्यता आहे.
वसमत परभणी रस्त्यावर थोरावा पाटी ते खांडेगाव दरम्यान वाहनधारकांना अडवून लुटमार केल्याची घटना बुधवारी रात्री घडली होती थोरावा पाटीजवळ बुधवारी रात्री तीन जणांनी मोटरसायकल अडवून चाकूचा धाक दाखवून सात हजार रुपये काढून येण्याचा प्रकार पडला होता. यात दुचाकी चालक रमेश श्रावणे जखमी झाले होते. त्यानंतर चोरट्याने एका ऑटोला अडवून ऑटोची तोडफोड केली होती. तसेच इतर वाहनधारकांवरही दगडफेक करून दहशत निर्माण केली होती वाहन अडवून सात हजार रुपये लुटल्याची तक्रार रमेश श्रावणे यांनी (Wasmat police) वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री केली होती.
तक्रार दाखल होताच (Wasmat police) वसमत ग्रामीण पोलिसांचे पथक सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे यांच्या नेतृत्वाखाली थोरावा परिसरात दाखल झाले त्यांनी शोधमोहीम राबवली असता तीन जण पोलिसांच्या तावडीत सापडले वाहन धारकांना अडवून दगडफेक करून चाकूचा धाक दाखवणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे पोलिसांनी अनिकेत माधव पांचाळ, केशव अशोक पांचाळ, दीपक प्रकाश पांचाळ सर्व राहणार थोरावा या तिघांना अटक करून पोलिसांनी वसमत न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे व त्यांच्या पथकाने तातडीने आरोपी अटक केल्याने या रस्त्यावरील वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे.
वसमत परभणी रस्त्यावरील थोरावापाटी ते खांडेगाव या रस्त्यावर काहीजण रात्रीच्या वेळी दगडफेक करून वाहनधारकांना अडवून लुटण्याचे प्रकार करत असतात वाहनधारक सहसा तक्रार देत नाहीत त्याचा फायदा हे चोरटे घेत आहेत. त्यामुळे या घटनेत अशा घटनात वाढ झाली आहे. बुधवारी (Wasmat police) वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होतातच पोलिसांनी तातडीने चोरट्यांना जेरबंद केली आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाटमाऱ्याच्या बटनांना लगाम लागणार आहे. ग्रामीण पोलिसांनी केलेल्या कारवाईचे कौतुक होत आहे.