वसमत (Wasmat police) : शहरातील श्रीनगर भागात मंगळवारी सायंकाळी विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे व पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथक वसमत पोलीस यांनी छापा मारून प्रतिबंधित असलेल्या गुटख्याचा मोठा साठा पकडला आहे रहिवाशी भागात सापडलेल्या एवढ्या मोठ्या गुटक्याच्या साठ्यामुळे वसमत शहरात खळबळ उडाली आहे यातील आरोपी मात्र फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले वसमत गुटखा विक्रेत्यांचे सुरक्षित अड्डा झाला असल्याचे या छाप्यामुळे पुन्हा एकदा समोर आली आहे.
वसमत तालुका गुटखा विक्रेत्यासाठी सुरक्षित अड्डा होऊन बसला आहे कुरुंदा येथील गुटखा विक्रेते वसमत शहरात येऊन गुटक्याची विक्री व तस्करी करत असल्याच्या तक्रारी आहेत वेळोवेळी पोलिसांनी कारवाया केल्या मात्र गुटखा विक्री बंद होत नाही गुटखा विक्रेत्याची मोठी साखळी वसमत तालुक्यात कार्यरत असल्याचे चित्र आहे वसमत शहरात खुलेआम हुटका विक्री वाहतूक व साठा होत असल्याचे चित्र आहे.
कुरुंदा येथे या गुटखा विक्रेत्याचे मुख्य केंद्र असल्याचे वृत्त आहे. या पृष्ठभूमिवर मंगळवारी सायंकाळी विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड व पोलीस अधीक्षक हिंगोली यांच्या विशेष पथकाने वसमत मध्ये येऊन छापा मारला गुप्त माहितीदाराने दिलेल्या माहितीच्या आधारावर श्रीनगर भागात पोलिसांनी कारवाई केली यात भीमाशंकर तुपकरी राहणार कुरुंदा हे किरायाने राहत असलेल्या किरायाच्या घरात छापा मारण्यात आला असला असल्याचे पोलिसांनी सांगितले गुटख्याचा सहा लाखापेक्षा जास्त साठा पोलिसांच्या तावडीत सापडला मात्र आरोपी फरार झाला असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
या छाप्यात पोलीस उपनिरीक्षक ठेंगे, पोलीस उपनिरीक्षक गवळी, कोकरे , गुहाडे, वाघ ,बारवकर घोडके, पडवळ यांच्यासह वसमत शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते. यातील आरोपीला अटक करून या गुटख्याचा साठा कुठून आला याचा शोध घेऊन विक्रेत्यांची साखळी उध्वस्त करणार असल्याचे पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांनी देशोन्नतीशी बोलताना सांगितले. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.