वसमत/हिंगोली (Wasmat thieves) : विवाहानिमित्त सहकुटुंब बाहेरगावी गेले असता कुलूप बंद असलेल्या घरातील लोखंडी तिजोरी (Wasmat thieves) चोरट्यानी उचलून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी (Wasmat City Police) वसमत शहर पोलिसांना अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेने खळबळ उडाली असून तिजोरीच उचलून नेणाऱ्या चोरट्यांचा शोध पोलीस कसा लावतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वसमत येथील मंगळवार पेठ भागातील रहिवासी माजी नगरसेवक रमाकांत भाऊ भागानगरे हे लग्नानिमित्त 29 जुलै रोजी सहकुटुंब बाहेरगावी गेले होते. त्यामुळे घराला कुलूप होते पाच ऑगस्ट रोजी त्यांच्या बंधूंनी त्यांना दाराचे कुलूप तुटलेले असल्याचे सांगितले. त्यामुळे सहा ऑगस्ट रोजी भाऊ भागानगरे हे वसमत येथे आले असता घरात चोरी (Wasmat thieves) झाल्याचे स्पष्ट झाले घरातील लोखंडी तिजोरी चोरीला गेली असल्याचे समजले. त्यांच्या घरात असलेली लोखंडी तिजोरी किमान एक ते दीड क्विंटल वजनाचे असावी एवढी मोठी तिजोरी चोरट्यांनी चोरून नेली आहे.
याप्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीवरून (Wasmat City Police) वसमत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भोसले तपास करत आहेत. एक ते दीड क्विंटल वजन असलेली लोखंडी तिजोरी उचलून नेण्यासाठी एकापेक्षा अधिक चोरटे (Wasmat thieves) असावेत चार चाकी वाहनातून ही तिजोरी चोरून नेली असावी असा संशय व्यक्त होत आहे. एवढी मोठी तिजोरी घेऊन जाणे हा प्रकार परिसरातील सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असण्याची शक्यता आहे. चोरट्यांनी पाळत ठेवून हा प्रकार केला असण्याची शक्यता आहे.