अमरावती (Water Apple) : अंदमान निकोबार बेटावर मोठ्या प्रमाणात आढळून येणाऱ्या ‘वॉटर ॲप्पल’ (Water Apple) ची चव आता विदर्भातही चाखायला मिळत आहे. अमरावती जिल्ह्यात (Melghat Forest) मेळघाटच्या पायथ्याशी असणाऱ्या धामणगाव गढी गावालगत रमेश जोशी यांच्या नर्सरीत ‘वॉटर ॲप्पल’ (Water Apple) बहरल्याचे बघायला मिळत आहे. उन्हाळ्यात हे फळ अतिशय गुणकारी असून, हे फळ खाण्याचे अनेक फायदे असल्याची माहिती जोशी नर्सरीचे संचालक आणि वनस्पती शास्त्राचे अभ्यासक असणारे (Chetan Joshi) चेतन जोशी यांनी दिली आहे.
‘वॉटर ॲप्पल’ चवदार आणि पौष्टिक फळ
आज जोशी नर्सरी आणि लगतच्या परिसरात वॉटर ॲप्पलची पाच झाडे आहेत. या सर्व झाडांना आता फळ देखील लागली आहेत. पाच वर्षांपूर्वी जोशी नर्सरीचे संचालक रमेश जोशी यांनी गोव्यावरून (Water Apple) वॉटर ॲप्पलचे एक रोप आणून (Melghat Forest) मेळघाटच्या पायथ्याशी असणाऱ्या त्यांच्या नर्सरीमध्ये लावले. त्यानंतर रमेश जोशी यांनी या झाडापासून आणखी चार रोपं तयार करून नर्सरीच्या परिसरात लावलीत. आज जोशी यांच्या नर्सरी परिसरात वॉटर ॲप्पलची पाच झाडे छान बहरली आहेत. तर, येणाऱ्या काळात (Water Apple) वॉटर ॲप्पलचे पन्नास रोपं आम्ही तयार करणार आहोत. आपल्या भागात देखील हे चवदार आणि पौष्टिक फळ रुजावे, वाढावे हा आमचा प्रयत्न असल्याचे रमेश जोशी आणि चेतन जोशी (Chetan Joshi) यांनी सांगितले.
गोव्यातून आणलेलं फळ आपल्या भागात : रमेश जोशी
चिखलदराकडे जाताना (Melghat Forest) मेळघाटच्या अगदी पायथ्याशी असणाऱ्या जोशी नर्सरीला भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जोशी कुटुंबाच्या वतीने आपल्या नर्सरीतील खास वॉटर ॲप्पल (Water Apple) चाखायला देतात. यासोबतच हे फळ नेमके काय आहे? ते कुठून आणलंय आणि त्याचा काय फायदा? याची देखील माहिती दिली जाते. गोव्यातून आणलेले हे फळ येत्या काही वर्षात आपल्या भागात देखील जिकडे तिकडे उपलब्ध व्हावे, हाच आमचा प्रयत्न असल्याचे रमेश जोशी (Ramesh Joshi) म्हणाले.