चिखली (Buldhana) :- जलसंधारण विभागाच्या(Department of Water Conservation) अधिकाऱ्यांनी कोणतीही विचारपूस न करता शेतात नाला खोदुन व मोठ मोठी झाडे तोडले आणि शेतातील उभ्या पिकाचे आतोनात नुकसान केले . ही नुकसान भरपाई मिळावी यासाठी सरपंच महिलेच्या वयोवृध्द असलेल्या सासूने आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे या उपोषणाला आज दुसरा दिवस उजाडला असून सुध्दा प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे.
कोणतीही परवानगी न घेता शेतात २५ फुट रुंद व ५० फुट लांब जागेवर सिमेंट बंधाऱ्या बांधकाम केले
चिखली तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या मनुबाई येथील सरपंच महिलेची सासू विमल विनायक वायाळ यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन नमुद केले आहे की मनूबाई गावालगत असलेल्या खडका शिवारात गट नं. २ मध्ये ३ हे. ४६ आर जमिन आहे. परंतु ही जमीन उपविभागिय जलसंधारण अधिकारी उपविभाग दे. राजा यांच्या हद्दीत येत आहे . या विभागांच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही परवानगी न घेता शेतात २५ फुट रुंद व ५० फुट लांब जागेवर सिमेंट बंधाऱ्या बांधकाम (Construction) केले. आणि या जागेवरील ५ जांभळीचे तोडून नाहीसे केले . या बाबत उपविभागिय अधिकारी जलसंधारण दे. राजा या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यानी झाडे तोडल्याचे कबुल केले मात्र नुकसान भरपाई दिली नाही त्यामुळे शेताची व झाडांची नुकसान भरपाई मिळावी यासाठी सरपंच महिलेच्या वयोवृध्द सासूने गेल्या दोन दिवसा पासून जलसंधारण विभागाच्या कार्यालया समोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. आज आमरण उपोषणाचा दुसरा दिवस उजाडला असला तरी प्रशासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही त्यामुळे जर प्रशासनाने दखल घेतली नाही तर होणाऱ्या घटनेला जबाबदार प्रशासन राहील असे उपोषण कर्त्या विमल वायाळ यांनी दै देशोन्नती शी सांगण्यात आले.