परभणी(Parbhani) :- जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा(Health Laboratory), लघु प्रयोगशाळेत दर महिन्याला जिल्हाभरातून प्राप्त होणार्या पाणी नमुन्यांची तपासणी केली जाते. पिण्याच्या पाण्याचे सार्वजनिक स्त्रोत तपासले जातात. जुलै महिन्यात प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात ४७ गावामध्ये दुषित पाणी नमुने आढळून आले आहेत.
पाणी शुध्दीकरणासाठी चांगल्या प्रतिचे व आयएसआय मार्क विरंजक चुर्णाचा पुरेसा पुरवठा
दुषित पाणी नमुन्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता पाणी शुध्दीकरणासाठी (Water purification) चांगल्या प्रतिचे व आयएसआय (ISI) मार्क विरंजक चुर्णाचा पुरेसा पुरवठा सर्व ग्रामपंचायतींना करण्यात यावा तसेच जोखीमग्रस्त भागातील पाणी नमुने तपासून घेणे, पिण्याच्या पाण्याच्या साठ्यांचे व्यवस्थित शुध्दीकरण करणे, नळ गळत्या शोधुन काढणे, हातपंपाच्या आजुबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे इत्यादी सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. जेणेकरुन जलजन्य रोगांचा प्रादुर्भाव (Outbreak of diseases)टाळणे शक्य होईल. जुलै महिन्यात तपासण्यात आलेल्या पाणी नमुन्यांमध्ये परभणी तालुक्यातील १०, पूर्णा तालुक्यातील ६, गंगाखेड तालुक्यातील ९, पालम तालुक्यातील ८, मानवत तालुक्यातील ४, जिंतूर तालुक्यातील ११ गावांमध्ये पाणी नमुने दुषित आढळून आले.
सोनपेठ, सेलू आणि पाथरी तालुक्यातील गावांमध्ये पाणी नमुने दुषित मिळाले नाहीत
जुलै महिन्यात परभणी तालुक्यातील १९९ पाणी नमुने तपासण्यात आले. त्यापैकी १२ नमुने दुषित आढळले. पूर्णा १५४ पैकी ७, गंगाखेड ९० पैकी ९, पालम ८९ पैकी ७, मानवत ८२ पैकी ४, जिंतूर १०९ पैकी ११ पाणी नमुने दुषित आढळले. सोनपेठ तालुक्यात तपासलेल्या ५२, सेलू तालुक्यात तपासलेल्या ७२ आणि पाथरी तालुक्यात तपासलेल्या ७७ पाणी नमुन्यांपैकी एकही पाणी नमुना दुषित आढळून आलेला नाही. ज्या ठिकाणी दुषित पाणी आढळले आहे. त्याच्या स्वच्छतेसाठी संबंधित यंत्रणांना सूचना देण्यात आल्या आहेत. पावसाळ्यामध्ये पाणी नमुने दुषित आढळण्याचे प्रमाण वाढते. दुषित पाण्यामुळे उलट्या, हगवण व इतर जलजन्य आजार होतात. पाणी स्वच्छ करुन पिणे आवश्यक असते. आजारांचा फैलाव होऊ नये, यासाठी प्रयोगशाळेकडून दर महिन्याला पाणी नमुने जमा करुन त्याची तपासणी केली जाते.
प्रत्येकी १० टक्के एवढे पाणी नमुने तपासणीत दुषित आढळून आले
जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा, परभणी व लघु प्रयोगशाळेत जुलै महिन्यामध्ये तपासण्यात आलेल्या एकूण पाणी नमुन्यापैकी ४७ गावामधील पाणी नमुने दुषित आढळले आहेत. ९२४ पैकी ५० पाणी नमुने दुषित. जुलै महिन्यामध्ये परभणी जिल्ह्यातील ९ तालुक्यामधून प्राप्त झालेले ९२४ पाणी नमुने तपासण्यात आले. त्यामध्ये ५० पाणी नमुने दुषित आढळले आहेत. गंगाखेड आणि जिंतूर तालुक्यात प्रत्येकी १० टक्के एवढे पाणी नमुने तपासणीत दुषित आढळून आले.