Weather Report :- मुंबईत पुन्हा एकदा मुसळधार पावसाने(Rain) कहर केला आहे. सततच्या पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे रेल्वे रुळांवरही परिणाम झाला असून त्यामुळे लोकल ट्रेनच्या (Train)सेवेवरही परिणाम झाला आहे, आज सकाळपासून काही ठिकाणी गाड्या धावण्यास सुरुवात झाली असली तरी त्यांचा वेग अत्यंत कमी असून त्याही त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा खूप उशिराने धावत आहेत.
सकाळपासून काही ठिकाणी गाड्या धावण्यास सुरुवात झाली असली तरी त्यांचा वेग अत्यंत कमी
#WATCH | Maharashtra | Latest visuals from Bandra Reclamation in Mumbai, following torrential rains last evening. Several areas of the city witnessed severe waterlogging and traffic followed by heavy rainfall yesterday.
As per IMD, Mumbai is likely to experience a 'generally… pic.twitter.com/pZPH7EfoWo
— ANI (@ANI) September 26, 2024
एवढेच नाही तर पावसामुळे काल सायंकाळी अनेक उड्डाणे वळवावी लागली, त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. हवामान खात्याने आजही येथे मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई(Mumbai), ठाणे(Thane), पालघर आणि रायगडमध्ये(Raigad) रेड अलर्ट जारी करण्यात आला असून शाळा(School) आणि महाविद्यालयेही बंद ठेवण्यात आली आहेत. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी आणि विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.बुधवारी सायंकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे शहरातील बससेवा(Bus), बेस्टलाही आपल्या सामान्य मार्गांमध्ये महत्त्वाचे बदल करावे लागले आहेत.