खरबी शेतशिवारातील प्रकार
बावनथडी प्रकल्प अधिकार्यांचे दुर्लक्ष
सुधिर गोमासे
तुमसर (Agricultural Irrigation) : तुमसर – मोहाडी तालुक्यातील शेतकर्यांना सि़चनांची सोय व्हावी, या उदात्त हेतूने महाराष्ट्र – मध्यप्रदेश राज्याच्या सिमेवर असलेल्या बावनथडी नदीच्या पात्रात ३५ वर्षांपूर्वी सितेकसा येथे बावनथडी प्रकल्पाचा पाया रोवला गेला. सदर बावनथडी प्रकल्पाच्या पाण्यापासून – मध्यप्रदेश राज्यासह महाराष्ट्रातील तुमसर – मोहाडी तालुक्यातील शेतकर्यांची (Agricultural Irrigation) शेती सिंचित करुन सुजलाम सुफलाम करु इच्छिणार्या बावनथडी प्रकल्पाच्या तुमसर – भंडारा मार्गाला खरबी शिवारातून छेदत गेलेल्या खरबी – कळमना मातीच्या वितरीेकेला गेल्या कित्येक वर्षांपासून भगदाड पडला आहे.
सदर भगदाड पडलेल्या कालव्याच्या वितरीका मधूनच (Agricultural Irrigation) शेती सिंचनासाठी पाणी सोडला जात आहे. परिणामी यंदाच्या खरीप हंगामातील कालव्यातील पाण्याच्या प्रवाहाने अथवा पावसाच्या पाण्याने फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे येथील बावनथडी प्रकल्पाच्या कालव्याच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तर संबधित बावनथडी प्रकल्पाच्या शाखा अभियंत्यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
यंदाच्या रब्बी हंगामात बावनथडी प्रकल्पाच्या पाण्यापासून तुमसर – मोहाडी तालुक्यातील साडे पाच हजार हेक्टर (Agricultural Irrigation) शेतजमीन सिंचित करण्यात आली असली तरी रोटेशन पद्धतीने यावर्षी उन्हाळी हंगामात खरबी शेतशिवारात लहान व मोठ्या वितरिकेला पाणी सोडला जाणार आहे, अशी माहिती आहे. परंतू येथे खरबी – कळमना कालव्याच्या वितरीकेला भगदाड पडला असून त्यातील माती पूर्णतः पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेली आहे. परिणामी सदर वितीरीका ऐन खरीप हंगामात पूर्णतः फुटून शेतशिवारात पाणी शिरून शेतीपिकाचे व शेतीचे नुकसान होण्याची शक्यता आहे. तरी देखिल अद्यापही सदर वितिरीकेच्या कामाकडे संबंधित अधिकार्यांनी लक्ष केंद्रित केले नाही.
एकीकडे बावनथडी प्रकल्पांतर्गत विविध ठिकाणी बावनथडी वितरीका व लहान कालव्याचे काम सुरु आहेत. परंतू येथील कालव्याच्या वितरीकेला भगदाड पडला असला तरी संबधित विभागाच्या अधिकार्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. भर उन्हाळ्यात सदर कालव्याच्या भगदाडाला दुरुस्त करण्याची गरज होती. परंतू आजघडीला खरीप हंगामातील पावसाळा सुरू झाला तरी सदर कालव्याच्या दुरुस्तीचे काम पुर्णत्वास गेले नाही. येथे सदर (Agricultural Irrigation) कालव्याची दुरुस्ती फुटल्यावर तर करणार नाही, असा प्रती प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.
त्यामुळे येथे बावनथडी प्रकल्पाच्या अधिकार्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. संबधित बावनथडी प्रकल्पाच्या अधिकार्यांनी याकडे लक्ष केंद्रित करून सदर भगदाड पडलेल्या कालव्याची डागडुजी करुन दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी खरबी येथील शेतकर्यांनी केली आहे. सदर प्रकरणी बावनथडी प्रकल्पाच्या शाखा अभियंतांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.