विहीर अधिग्रहण प्रस्ताव मंजूर मात्र विहिरीत पाणीच नाही
देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलढाणा (Water shortage) : ग्रामीण भागात गावागावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. अशातच अंत्री खेडेकर येथील भीषण (Water shortage) पाणी टंचाई महिलांच्या पाचवीलाच पुजलेली आहे. ही भीषण पाणी टंचाई दूर करण्यासाठी शासनाकडून (Well acquisition) विहिर अधिग्रहण प्रस्ताव मंजूर करण्यात आला. मात्र विहिरीत पाणीच नसल्याने महिलांना हंडाभर पाण्यासाठी मोठी कसरत करत वणवण भतंकती करावी लागत आहे. अशी तक्रार अंत्री खेडेकर उपसरपंच सुनीता मोरे यांनी केली आहे.
उपसरपंच सौ मोरे यांची तक्रार
चिखली तालुक्यातील अंत्री खेडेकर गावाची लोकसंख्या चार ते पाच हजाराच्या वरती असून गावात सर्व जाती धर्माच्या लोकांचे वास्तव्य आहे. त्यात अर्धे गावाची वस्ती रोडच्या खाली आहे तर अर्धे गावाची वस्ती रोडच्या वरती बसलेली आहे त्यामुळे ५० टक्के गावकरी खाजगी नळ योजनेद्वारे पाणी घेतात तर ५० टक्के जनतेची (Water shortage) भीषण पाणी टंचाई त्यांच्या पाचवीलाच पुजलेली आहे. मार्गावर राहत असलेल्या जनतेला पूर्वी पासून भीषण पाणी टंचाईचां सामना करावा लागत असल्यामुळें दररोज महिला डोंक्यावर पाण्याचे हंडे घेवून शिवाजी खेडेकर यांच्या विहिरी मधुन बकेटणे पाणी काढूण पोटाची तहान भागवतात. ही भीषण पाणी टंचाई दूर करण्यासाठी ग्रा. प. प्रशासनाने शासनाकडून (Well acquisition) विहीर अधिग्रहण प्रस्ताव मंजुर करूण घेतला. परंतु गावालगतच्या विहिरीमध्ये पाणीच नसल्याने टँकर पाण्याअभावी उभे आहेत.
तसेच ज्या विहिरी मध्ये पाणी आहे. त्या विहिरीवर टँकर नेण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. तरी संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांनी तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राम खेडेकर यांनी तात्काळ दखल घेवून भीषण (Water shortage) पाणी टंचाईची दूर करण्याचा प्रयत्न करावा अशी मागणी उपसरपंच सौ सुनीता भास्कर मोरे यांनी केली आहे.
याबाबत उपसभापती राम खेडेकर तसेच ग्रा. प. प्रशासनाकडून माहिती घेतली असता त्यांनी सागितले की गावाची (Water shortage) भीषण पाणी टंचाई कायमची दुर करण्यासाठी शासनाकडून खडकपूर्णा प्रकल्पा वरुण विहीर व पाईप लाईन मंजूर झालेली आहे आणि त्या योजनेचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. लवकरच गावात प्रत्येक घरोघरी नळ योजनेद्वारे शुध्द पाणी पुरवठा केल्या जाणार आहे, असे दैं देशोन्नती शी सांगण्यात आले.