खासदार नागेश पाटील आष्टीकर चांगलेच संतापले!
कळमनुरी (Water Shortage) : ग्रामीण भागात पाणीटंचाई प्रश्न सोडविण्यासाठी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या उपस्थितीत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती परंतु या आढावा बैठकीत सरपंचांना उपाययोजनाबद्दल गटविकास अधिकाऱ्यांनी उडवा उडवी चे उत्तर दिल्याने खासदार नागेश पाटील अष्टीकर हे चांगलेच संतापले होते जर तुमच्याकडे काहीच माहिती नसेल तर बैठक घेऊन काय उपयोग होणार लोकांना तुमच्यामुळे पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे हे उपायोजना करणे ही चूक नसून गुन्हा आहे अशी संतप्त प्रतिक्रिया खासदार नागेश पाटील अष्टीकर यांनी बैठकीत व्यक्त केली.
प्रश्नावर गटविकास अधिकाऱ्यांची चांगलीच भांबेरी उडाली..
कळमनुरी तालुका व औंढा तालुका या ग्रामीण भागातील पाणीटंचाई (Rural Areas Water Shortage) आढावा बैठक दि.19 मे रोजी प्रशासकीय इमारतीच्या अब्दुल कलाम सभागृहात खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या उपस्थितीत पाणीटंचाई आढावा बैठक घेण्यात आली बैठक सुरू होताच यावर्षी पंचायत समिती (Panchayat Committee) स्तरावर पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी एकही बैठक घेण्यात आली असल्याचा आरोप प सरपंचांनी (Sarpanch) केला याबद्दल गटविकास अधिकाऱ्यांनी ही बैठक घेतली नसल्याची कबुली दिली तसेच बोर व विहीर अधिग्रहण बद्दल प्रश्नावर गटविकास अधिकाऱ्यांची (Group Development Officer) चांगलीच भांबेरी उडाली होती. तसेच कोणत्याही प्रश्नावर प्रशासनाच्या वतीने समाधानकारक उत्तर अपेक्षित असताना मात्र प्रशासनाच्या वतीने उडवा उडवी चे उत्तर मिळाल्यानंतर खासदार नागेश पाटील आष्टीकर हे चांगलेच संतापले प्रशासनाच्या नियोजन अभावी लोकांना पाणी मिळत नाही ही चूक नसून गुन्हा आहे अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली तसेच घरकुल लाभार्थ्यांना शासनाच्या (Government) धोरणानुसार वाळू उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही या बैठकीत खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी खासदार नागेश पाटील आष्टीकर, माजी आमदार डॉ. संतोष टारफे,उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते, तहसिलदार जीवककुमार कांबळे, औंढा नागनाथ चे तहसीलदार हरीश गाडे, गटविकास गणेश बोथिकर, गोपाल कल्लारे, नगर पालिकेचे मुख्याधिकारी रविराज दरक, शिवसेना जिल्हाप्रमुख अजय सावंत उर्फ गोपू पाटील,बाळासाहेब मगर,मारोतराव खांडेकर, नागोराव करंडे, बंडू पाटील, नंदकिशोर तोष्णीवाल, शिवा शिंदे अब्दुल्ला पठाण, आदींची उपस्थिती होती.
पाणीटंचाई आढावा बैठकीस तेरा ग्रामसेवकांची दांडी!
पाणीटंचाई आढावा बैठकीला सुरुवात होताच खासदार नागेश पाटील आष्टीकर (MP Nagesh Patil Ashtikar) यांनी ग्रामसेवकांची हजेरी घेतली असता या बैठकीला कळमनुरी तालुक्यातील नऊ तर औंढा तालुक्यातील चार अशा एकूण तेरा ग्रामसेवकांनी (Gram Sevak) दांडी मारल्याचे लक्षात आल्यानंतर गैरहजर ग्रामसेवकाविरुद्ध कारवाई करण्याचा सूचना खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.