परभणी (Parbhani):- शहराला पाणी पुरवठा करणार्या मुख्य जलवाहिनीला जिंतूर रोडवर गळती लागली आहे. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे.
दुरुस्तीच्या कामासाठी पुढील दोन दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार
दुरुस्तीच्या कामासाठी पुढील दोन दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या बाबत महापालिका (Municipality)शहर अभियंत्यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. परभणी शहराला नवीन जलवाहिनीद्वारे(aqueduct) पाणी पुरवठा केला जात आहे. धर्मापुरी येथे असलेल्या जलशुध्दीकरण केंद्राला येलदरी येथून जलवाहिनीद्वारे पाणी येते. जिंतूर रोडवर असलेल्या कार्निवल हॉटेलजवळ मुख्य जलवाहिनीला गळती लागली. यामुळे पाणी वाया गेले. तसेच शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला. शहर महापालिकेने जलवाहिनी दुरुस्तीचे काम युध्द पातळीवर हाती घेतले आहे. सोमवार ८ व मंगळवार ९ जुलै रोजी जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे दोन दिवस शहराला होणारा पाणी पुरवठा बंद राहिल. जलवाहिनीच्या दुरुस्तीनंतर पुन्हा पाणी पुरवठा(Water supply) सुरळीत करण्यात येईल. काम पूर्ण होण्यासाठी दोन दिवस लागणार असल्याने पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक(Schedule) कोलमडणार आहे. जेसीबी(JCB) यंत्राच्या सहाय्याने जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम केले जात आहे.
दुरुस्तीचे काम सुरू
मुख्य जलवाहिनीला लागलेल्या गळतीचे दुरुस्ती काम सुरू करण्यात आले आहे. दुरुस्तीसाठी दोन दिवसांचा वेळ लागणार आहे. त्यामुळे परभणी शहराला होणारा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. पुढील दोन दिवस पाणी येणार नसल्याने शहर वासीयांना निर्जळीचा सामना करावा लागणार आहे. युध्द पातळीवर जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.