एका वर्षाने धुतली जाते पाण्याची टाकी
नेर (water supply) : शहरात नेर नगरपरिषदेच्या वतीने पाणी पुरवठा विभागाच्या वतीने गलथान कारभाराने कळस गाठला आहे. शहरातील तीन विहीरी व शहराला (water supply) पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केवळ दोन टाक्यामधुन असून शहराला अपुरा पाणी पुरवठा होतो. मात्र एक टाकी ती ५० मिटर उंचीवर तर दुसरी टाकी जमिनीच्या खोलवर असुन परस्पर दोन्ही टाक्या विरुध्द असतांना ह्या वर्षभराने धुतल्या जातात. एका टाकीवर नादुरुस्त जलशुद्धीकरण यंत्र असून एका टाकीवर मात्र पाणी शुद्धीकरणाची कोणतीही व्यवस्था नाही. असा धक्कादायक प्रकार (Ner Nagar Council) नेर नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाच्या (Department of Health) नजरेखाली सुरू आहे.
जलशुद्धीकरण उपकरणाची सोय नाही
नेर शहरात नबाबपूर, अशोक नगर, चमन नगर, तंबाखे नगर यासह विविध भागात दत्त मंदिर जवळील विहीर व १२ धारी जवळील विहिरीतून (water supply) पाणीपुरवठा होते. मात्र दोन्ही विहिरी घाणीच्या साम्राज्यात असल्यामुळे शेतातील निचरा पाणी या विहिरीमध्ये जाते. यामुळे नागरिकांना अशुद्ध , गढूळ व जंतुजन्य पाणी प्यावे लागते. दरवर्षी ब्लिचिंग पावडर चा खर्च हा ७ लाखावर खर्च पोहचतो.परंतु आजतागायत ही (Ner Nagar Council) नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाला (Department of Health) जाग आली नाही.
यामुळे आरोग्य विभागाचे प्रमुख नागरिकांच्या आरोग्या सोबत जीवघेणा खेळ करत असल्याचे चित्र दीसत आहे. या अशुद्ध पाणी पुरवठ्यामुळे शहरात सर्दी ,खोकला, व मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रो या सारख्या आजाराने लहान मुले व नागरिक त्रस्त आहे. याबाबत (water supply) पाणी पुरवठा अभियंता भुषण चव्हाण यांच्याशी संपर्क केल्यानंतर त्यांनी सदर पाणी पुरवठा होत असतांना (Ner Nagar Council) नेर नगर परिषेदेकडे साधन संसाधन उपलब्ध नसल्याने सद्यास्थीतित पर्याय नाही. परंतु १७० कोटी रुपयांची योजना प्रस्थापित आहे.