रिसोड (Water Supply) : ग्रामीण भागात जलजीवन मिशन (Jaljeevan Mission) अंतर्गत सुरू असलेली नळ पाणीपुरवठा योजना (Tap Water Supply Scheme) अद्याप पूर्णत्वास गेलेली नाही. अनेक गावांमध्ये ही कामे अंतिम टप्प्यात असली, तरी गेल्या काही वर्षांपासून संथगतीने सुरू असल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी पाइपलाइन आणि पाण्याच्या टाक्यांचे (Water Tanks) काम अर्धवट स्थितीत आहे. या कामांच्या विलंबामुळे गावकऱ्यांना (Villagers) अजूनही नियमित व स्वच्छ पाणीपुरवठा (Clean Water Supply) मिळत नाही. ग्रामस्थांनी यासंदर्भात वेळोवेळी स्थानिक प्रशासन (Local Administration) आणि संबंधित विभागाकडे निवेदनाद्वारे पाठपुरावा केला आहे. नळ योजना वेळेत पूर्ण करून पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी रिसोड तालुका भाजपा अध्यक्ष सुभाष खरात यांनी केली.
