नगरपालिका प्रशासनाकडे पाणीपुरवठा संदर्भात तोंडी तक्रारी!
रिसोड (Water Supply) : गत 2 महिन्यापासून रिसोड शहराला पाणीपुरवठा गढूळ (Muddy Water Supply) होत असून, तसेच पाण्याचा रंग पिवळसर असून, पाण्यातून दुर्गंधी येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. यापूर्वी अनेक वेळा नगरपालिका प्रशासनाकडे (Municipal Administration) पाणीपुरवठा संदर्भात तोंडी तक्रारी केलेल्या आहेत परंतु, त्या तक्रारीची कोणत्याही प्रकारची दखल पालिका प्रशासनाने घेतलेली नाही. हल्ली महिन्यात 5 दिवसच पाणी पुरवठा होत आहे. त्यामध्ये अनेकवेळा तांत्रिक त्रुटी येत असल्यामुळे लाईन जाणे, पाईप लाईन फुटणे (Pipeline Burst) आदी कारणांमुळे एका महिन्यात चारच दिवस पाणीपुरवठा होत आहे.
पाणीपुरवठा विभाग आलम व ब्लिचिंगची योग्य गुणवत्ता तपासून पाण्यामध्ये मिश्रण करावे!
नळातून येत असलेल्या पाण्यात चाटू येत आहे. परिणामी नागरिकांना पोटदुखी तेसेच डायरियाची लागण (Diarrhea Infection) होत आहे. सध्या होत असलेल्या पाणीपुरवठ्यात पाणीपुरवठा विभाग (Water Supply Department) आलम व ब्लिचिंगची योग्य गुणवत्ता तपासून पाण्यामध्ये मिश्रण करावे. तसेच या महत्वपुर्ण विषयाकडे आपणा स्वतः गांभीर्यपूर्वक लक्ष घालून हा विषय तातडीने मार्गी लावावा, अन्यथा जनतेतून तिव्र जनआंदोलन (Mass Movement) करण्यात येईल याची दखल घ्यावी अशी मागणीचे निवेदन माजी नगरसेवक फयाज अहमद (Former Corporator Fayaz Ahmed) यांनी दिनांक 9 जून रोजी नगरपरिषद पाणीपुरवठा अभियंता डाखोरे यांना दिले आहे निवेदन देताना संजय आत्माराम राऊत, अनंता बबनराव देशमुख, संतोष शेषराव घुगे, अनंत तुळशीराम भालेराव, प्रवीण केशवराव सरनाईक, अनिल नागोराव देशमुख, सुनील विश्वनाथ मोरे, आर एस शहा, दत्ता नगरकर, बाळू कोठुळे, शीतलकुमार धांडे, निलेश विलास सरोदे, राजू रामभाउ, बाळासाहेब भांदुर्गे, गोपाल कृष्णा संत आदी उपस्थित होते.