पाण्याचा जपून वापर करावा: मुख्याधिकारी मुंढे
हिंगोली (Hingoli Water Supply) : सिद्धेश्वर येथील मुख्य जलवाहिनी दुरूस्तीच्या कामामुळे २१ व २२ ऑगस्टला दोन दिवस (Hingoli Water Supply) हिंगोली शहरात निर्जळी राहणार असल्याने नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांनी केले आहे.
सिद्धेश्वर धरणातून हिंगोली शहराला पाणीपुरवठा केला जातो; परंतु सिद्धेश्वर येथे मुख्य जलवाहिनी दुरूस्तीचे काम असल्याने नगर परिषदेच्यावतीने हे काम घेण्यात आले आहे. त्यामुळे २१ व २२ ऑगस्टला दोन दिवस हिंगोली शहरात पाणी पुरवठा योजनेंतर्गत हिंगोली शहरास सोडला जाणारा (Hingoli Water Supply) पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांनी केले आहे.