नवी दिल्ली/ मुंबई (Weather Forecast) : अखेर देशातील जनतेला उष्णतेपासून दिलासा मिळाला असून, आज सकाळी (Weather Forecast) हवामानात बदल बघायला मिळाले. आज सकाळी बहुतेक भागात पावसाने हजेरी लावली. यामुळे उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाने येत्या 48 ते 72 तासांत मान्सून दाखल होण्याचा अंदाज वर्तविला आहे. जाणून घ्या आजचे हवामान!‘या’ भागात मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा,
उष्णतेचे दिवस संपले, थंड पाऊस बरसले
सध्या राजधानीत तापमान 35 ते 36 अंशांच्या दरम्यान असून, सायंकाळपर्यंत (heavy rain) हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. 3 जुलैपर्यंत येथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. आता मान्सून गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या अनेक भागात पोहोचला असून, आज अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस (Heavy rainfall) पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. आनंदाची बातमी: उष्णतेपासून मिळणार दिलासा
#WATCH मुंबई: शहर के कई हिस्सों में बारिश हुई। वीडियो GPO और छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस से है। pic.twitter.com/VNGed3AxZv
— ANI_HindiNews (@AHindinews) June 27, 2024
अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता
मुंबई शहरातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली. हा व्हिडिओ जीपीओ आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील आहे. दुसरीकडे, दक्षिण भारतात मान्सून सक्रिय असून केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, सिक्कीम, आसाममध्ये आजही पावसाचा रेड अलर्ट कायम आहे. (Weather LIVE) हिमाचल प्रदेश, लडाख, जम्मू-काश्मीर, उत्तराखंडमध्ये पावसाचा रेड अलर्ट कायम आहे. उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये मान्सून दाखल झाला आहे, त्यामुळे अनेक प्रांतात पाऊस पडत आहे. मात्र काही ठिकाणी लोक अजूनही पावसासाठी आकाशाकडे बघत आहेत. आज अनेक भागात सकाळी पावसामुळे वातावरण आल्हाददायक झाले आहे. आज हिमाचल प्रदेश, लडाख, जम्मू-काश्मीर, उत्तराखंडमध्ये पावसाचा अलर्ट (Weather Alert) जारी करण्यात आला आहे.