नवी दिल्ली (Weather Forecast) : देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाची चाहूल लागली आहे. दिल्ली, यूपी, बिहार, पंजाब, हरियाणामध्ये वातावरण उष्ण असतांना, हवामान विभागाने लोकांना मोठी खूशखबर दिली आहे. 30 जूनच्या आसपास मान्सून दाखल होणार असून, (Weather Forecast) मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्णतेची लाट फक्त 8-10 दिवसापर्यंतच राहणार असल्याचा अंदाज IMDने वर्तवला आहे. विशेष म्हणजे 30 तारखेला मान्सून दाखल होणार असून, त्यापूर्वीच येथे प्री-मॉन्सून क्रियाकलाप सुरू होईल, म्हणजेच पावसाळा सुरू होणार आहे.
येथील हवामानात सायंकाळपर्यंत होणार बदल
आजच्या हवामानानुसार (Weather Department), आज तापमान 40 च्या वर राहील, पण दुपारनंतर धुळीचे वादळ आणि हलका पाऊस (Rain weather) अपेक्षित आहे. ज्यामुळे लोकांना तात्काळ दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार थोडासा दिलासा
सध्या हवामान विभागाची (Weather Department) ही माहिती खूपच दिलासा देणारा आहे. कारण उष्मा आणि पाणीटंचाईचा सामना करत असलेले लोक सतत पावसासाठी देवाकडे प्रार्थना करत आहेत, इतकेच नाही तर प्रदूषणानेही त्रस्त झाले असून, आता त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
येथे हलका ते मध्यम पाऊस पडणार
हिमाचल प्रदेश, लडाख, जम्मू आणि काश्मीर, मुझफ्फराबाद, उत्तराखंड, गिलगिट आणि बाल्टिस्तानमध्ये हलका ते (Rain weather) मध्यम पाऊस पडू शकतो. तसेच पंजाब, हरियाणा, यूपी, बिहार आणि राजस्थानमध्ये उष्णतेच्या लाटेसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.