नवी दिल्ली/ मुंबई (Weather Forecast) : संपूर्ण उत्तर भारतात हवामानाचे स्वरूप अचानक बदलले आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये (Monsoon update) मान्सूनपूर्व हालचाली सुरू झाल्या आहेत. आता लोकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळणार आहे. राजधानी दिल्लीत हलक्या पावसानंतर उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. उत्तर भारतात गेल्या 24 तासांत वादळी वारे आणि (Heavy Rain) मुसळधार पावसामुळे तापमानात घट नोंदवण्यात आली आहे.
पाऊस किंवा वादळ वा धुळीच्या वादळाची शक्यता
भारतीय हवामान विभागानुसार (Weather Department), हलका पाऊस आणि वादळामुळे उष्णतेच्या लाटेपासून दिलासा मिळाला आहे. आज शुक्रवारी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता वर्तवली आहे. पाऊस किंवा वादळ वा धुळीच्या वादळाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कमाल आणि किमान तापमान 40 आणि 29 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. आर्द्रता 67 टक्के ते 46 टक्के दरम्यान असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी
पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये मुसळधार पावसाचा रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आला आहे. नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील 5 दिवसांत हिमालयीन पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा आणि उपनगरांमध्ये गडगडाट, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील 5 दिवसांत उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये मुसळधार (Heavy Rain) ते अतिवृष्टीची शक्यता आहे.
कधी येणार मुसळधार पाऊस?
हवामान विभागानुसार (Weather Department), मंद गतीने सुरू झाल्यानंतर मान्सूनने आता वेग पकडला असून, तो आता उत्तरेकडे सरकला आहे. मान्सून ओडिशा, छत्तीसगड, उत्तर-पश्चिम बंगालचा उपसागर, उप-हिमालयी बंगाल आणि बिहारच्या काही भागांमध्ये पोहोचणार आहे. (Weather Forecast) हवामान विभागानुसार, 27 जून ते 3 जुलै दरम्यान, (Monsoon update) मान्सून मध्य भारत आणि उत्तर-पश्चिम भारतातील बहुतेक भाग व्यापेल आणि (Heavy Rain) मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
येत्या 5 दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता
IMD च्या अंदाजानुसार, दिल्ली, बिहार, झारखंड आणि अंदमान आणि निकोबार बेटांच्या काही भागात पुढील 2 ते 3 दिवसांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि गुजरात भागात मुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता आहे. येत्या 5 दिवसांत पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेशात मुसळधार पावसाची शक्यता आहे. गेल्या 24 तासांत मान्सूनपूर्व आणि वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे उत्तर भारताच्या काही भागात जोरदार वादळे आणि पाऊस पडला. बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या गडबडीमुळे आणि पूर्वेकडील वाऱ्यांमुळे जम्मू, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, उत्तर हरियाणा, चंदीगड आणि उत्तर उत्तर प्रदेशमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची नोंद झाली आहे.