केरळ आणि कर्नाटकात मुसळधार पावसाचा इशारा, दिल्लीत उष्णतेचा कहर
नवी दिल्ली (Weather Forecast) : उत्तर भारतात तीव्र उष्णता (Heat wave) कायम राहण्याची शक्यता आहे. दिल्ली NCRसह अनेक राज्यांमध्ये तापमानात वाढ झाल्याने उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दिल्ली (Weather Forecast) हवामान विभागाचे शास्त्रज्ञ सोमा सेन यांनी सांगितले की, दिल्लीत वेस्टर्न डिस्टर्बन्स निघून गेला आहे. आकाश आता निरभ्र असून, पुढील 5 दिवस संपूर्ण उत्तर पट्ट्यात (Heat wave) उष्णतेची लाट कायम राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहेत.
येथे CLICK करा: कुठे अतिवृष्टी तर कुठे अति उष्णता; जाणून घ्या हवामान!
केरळ आणि महाराष्ट्रातही पावसाचा इशारा
सिक्कीम-पश्चिम बंगालमध्ये (Heavy rain) अतिवृष्टीची शक्यता आहे. गोवा, तेलंगणा, केरळ आणि कर्नाटकमध्येही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बिहार, पूर्व उत्तर प्रदेश आणि झारखंडसाठी पुढील दोन-तीनसाठी रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आला आहे. यावेळी 18-19 जूनपर्यंत पूर्वेकडील वारे वाहण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे बिहार आणि आसपासच्या भागात वादळी वारे येण्याची शक्यता आहे.
IMDकडून अलर्ट जारी
पुढील 3 ते 4 दिवसांत उत्तर प्रदेश, गंगेच्या पश्चिम बंगाल, बिहार आणि झारखंडच्या काही भागांमध्ये (Heat wave) उष्णतेची लाट ते गंभीर उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज IMD ने वर्तवला आहे. पंजाब, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. (Weather Forecast) हवामान विभागाने आरोग्याबाबत जागरूक राहून सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.