नवी दिल्ली (weather rain) : काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत उष्णतेने उग्र रूप धारण केले आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये ‘उष्णतेची लाट’चा इशारा देण्यात आला आहे. अनेक ठिकाणी शाळांना वेळेआधीच उन्हाळी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र गेल्या दोन दिवसांपासून काही ठिकाणी उष्णतेची लाट थोडी सौम्य झाली आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, आता संपूर्ण देशातून उष्णतेची लाट नाहीशी होणार आहे. आयएमडीचे शास्त्रज्ञ सोमा सेन यांनी मीडियाला सांगितले की, आता देशातून उष्णतेची लाट लवकरच संपणार आहे. फक्त पश्चिम राजस्थान आणि केरळमध्ये ‘उष्णतेची लाट’ अलर्ट जारी करण्यात आला आहे.
यलो अलर्ट जारी
उद्याला शुक्रवारी उष्णतेची लाट (Heat wave) फक्त पश्चिम राजस्थानमध्येच राहील, खबरदारीचा उपाय म्हणून येथे (Yellow Alert) येलो अलर्ट जारी केला आहे. सध्या बंगालच्या उपसागरात आर्द्र दाब निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये (weather rain) पावसाची शक्यता आहे आणि काही ठिकाणी गारपीट आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.
राजधानीत हलक्या पावसाची शक्यता
राजधानी दिल्लीत उद्या हलका पाऊस (weather rain) पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे ढगाळ वातावरण राहील. या काळात ताशी 30 किमी वेगाने वारे वाहतील. दुसरीकडे कमाल तापमान 39 आणि किमान 26 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
या ठिकाणी वातावरण प्रसन्न
पुढील दोन दिवस मध्य प्रदेश, छत्तीसगड, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असली तरी कर्नाटक आणि तामिळनाडूमध्येही (weather rain) हलक्या पावसाची शक्यता आहे.
पर्वतीय प्रदेशातही पावसाचा इशारा
हवामान खात्याने पर्वतीय प्रदेशातही (weather rain) पावसाचा इशाराही जारी केला आहे. काही ठिकाणी गारपीट आणि विजांचा कडकडाट होऊ शकतो. उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब आणि हरियाणामध्ये (Heat wave) उष्णतेची लाट कायम राहील. लोकांना कडक उन्हाचा सामना करावा लागणार आहे.