नवी दिल्ली (Weather Report) : राजधानी दिल्लीत उष्णतेबाबत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र, येत्या दोन-तीन दिवसांत वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता (Weather Forecast) हवामान विभागाने वर्तवली आहे. हिमाचल प्रदेश आणि बिहारमध्येही अशीच परिस्थिती अपेक्षित आहे. IMDचे शास्त्रज्ञ सोमा सेन यांनी सांगितले की, पंजाब आणि हरियाणासह भारतातील उत्तर-पश्चिम हिमालयीन भागात संध्याकाळपासून ढगाळ वातावरण राहील आणि पाऊसही अपेक्षित आहे. त्याचवेळी, मेघालय, महाराष्ट्र सिक्कीम येथे गेल्या 24 तासांत विविध ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. चेन्नईमध्ये 23 जूनपर्यंत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
आसाम, मेघालय, सिक्कीममध्ये पुराचा इशारा
आसाम, मेघालय आणि सिक्कीममध्ये सततच्या पावसानंतर पुराचा धोका निर्माण झाला आहे. याबाबत (Weather Forecast) हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाच्या सूचनेनुसार, पावसानंतर भूपृष्ठावर पाणी साचल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण पूर येऊ शकतो.
मुसळधार पावसाची शक्यता
अरुणाचल प्रदेश, महाराष्ट्र, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा येथे मुसळधार पावसाची शक्यता असून त्यामुळेच (Weather Forecast) हवामान विभागाने पुढील 5 दिवसांसाठी अलर्ट जारी केला आहे.
3-4 दिवसांत हलका पाऊस पडण्याची शक्यता
उष्णतेशी झगडणाऱ्या दिल्लीकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. (Weather Forecast) हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या तीन-चार दिवसांत हलका पाऊस आणि वादळी पावसाची शक्यता आहे.