नवी दिल्ली (Weather Report) : दिल्ली-एनसीआर ते उत्तर प्रदेशपर्यंतच्या लोकांना कडक उन्हापासून दिलासा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली नसून, दुपारनंतरचे तापमान 40 च्या वर नोंदवले जात आहे. (Meteorology Department) हवामान विभागाच्या माहितीनुसार, तीन राज्यांमध्ये उष्णतेची लाट कायम राहणार आहे. उत्तर-पूर्वेकडील काही राज्यांमध्ये पुढील काही दिवस पाऊस पडणार आहे.
कुठे पडणार पाऊस ?
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, 14 मे पर्यंत अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या ईशान्येकडील राज्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडणार आहे. मेघगर्जना, विजांचा कडकडाट (Hailstorm) आणि सोसाट्याचा वारा येण्याचीही शक्यता आहे. याशिवाय 10 आणि 11 मे रोजी अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयात (heavy rain) मुसळधार पाऊस पडेल. त्याचवेळी, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये 9 ते 10 मे दरम्यान मेघगर्जना होण्याची शक्यता आहे.
बिहारपासून महाराष्ट्रापर्यंत हवामानात बदल
हवामान विभागाच्या माहितीनुसार, बिहार, झारखंड आणि ओडिशामध्ये 11 मेपर्यंत उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे. पाऊस आणि मेघगर्जनेमुळे लोकांचा मूड बदलला आहे. त्याचवेळी, आज 8 ते 11 मे दरम्यान महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्येही पाऊस पडेल. आज (Maharashtra Weather) महाराष्ट्रात गारपीट होण्याची शक्यता आहे. याशिवाय तामिळनाडू, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ आणि कर्नाटकमध्ये 12 मेपर्यंत मुसळधार पाऊस (heavy rain) पडणार आहे.
राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश व उत्तरी आंतरिक कर्नाटक के अलग-अलग स्थानों में 08 मई, 2024 को उष्ण लहर होने की संभावना है।#heatwave #heatwavealert #weatherupdate@moesgoi @DDNewslive @ndmaindia @airnewsalerts pic.twitter.com/x23V3MIdXG
— India Meteorological Department (@Indiametdept) May 7, 2024