लातूर (weather report): हवामान खात्याने(Department of Meteorology) दिलेल्या अंदाजानुसार जिल्हा तसेच परिसरात मागील चार दिवसांपासून दररोज पाऊस पडत असून सोमवारी जिल्ह्यातील निलंगा, चाकूर देवणी, औसा, रेणापूर यासह इतर ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसाने (Heavy rain) तब्बल महिनाभर पावसाची सरासरी ओलांडली आहे. तर अहमदपूर तालुक्यात या पावसाचे प्रमाण कमीच आहे.
कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने त्याच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात पावसाला सुरुवात
पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने त्याच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झाली आहे. दरम्यान हवामान खात्याने दोन दिवस राज्यातील काही भागात पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला होता त्यानुसार लातूर जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून सतत पाऊस सुरु आहे. सोमवारी सायंकाळी चार वाजल्यानंतर वातावरणात अचानक बदल होऊन निलंगा, चाकूर, शिरूर अनंतपाळ, देवणी, रेणापूर, औसा याठिकाणी विजाच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला. निलंगा, रेणापूर तालुक्यात कांही ठिकाणी वीज कोसळ्याच्या घटना घडल्या. मृग धो-धो बरसला रानावर पाणीच पाणी साचल आहे. त्यामुळे बळीराजाची पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे. यंदाचा मृग नक्षत्राचा पाऊस वेळेत व मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी चालू केली असून खत बि- बियाणे याची जुळवा जुळव करण्यास सुरवात केली आहे.
गेल्या मे महिन्यात निलंगा तालुक्यात काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाने नुकसान झाले होते. तसेच विज पडून आंबेगाव येथील एक शेतकरी (Farmer)दगावला होता. तर अनेक गावात विजा पडून शेतकऱ्यांचे पशुधन दगावले होते. आवकाळीचा मोठा फटका निलंगा तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. आवकाळी पावसाबरोबर काही भागात गारांचाही पाऊस झाल्याने यावर्षी मृग नक्षत्राचा पाऊस वेळेवर पडणार नाही, असा आंदाज बांधला जात होता. परंतु मृग निघाल्यापासून सर्वसमावेशक पेरणी योग्य पाऊस पडत अ असल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे. निलंगा तालुक तालुक्यातील अंबुलगा बु, निटूर, शेडोळ, हलगरा, औराद शा. सरवडी, मदनसुरी, पान चिंचोली, कासार बालकुंदा, कासार शिरसी मंडळात सर्वसमावेशक व जोराचा पाऊस झाला असून रानावर सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे. तसेच शेत शिवारात पाण्याने तुंब मारल्याने अनेकांचे बांध फुटले आहेत. पहिल्याच पावसाने ओढे नालेभरून वाहत असून जिल्ह्य़ात निलंगा, चाकूर, देवणी, औसा रेणापूर तालुक्यातील पावसाने तब्बल महिनाभर पावसाची सरासरी ओलांडली आहे.