फक्त ‘या’ भागात मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा
नवी दिल्ली/मुंबई (Weather Report Today) : महाराष्ट्र-कर्नाटक, दक्षिण मध्य प्रदेश, कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसेच किनारपट्टी आणि उत्तर कर्नाटकात मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. (Weather Department) हवामान खात्याने हमीरपूर, उना, बिलासपूर, मंडी, सोलन आणि सिरमौरमध्ये 12 जूनपासून पुढील 48 तासांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. 14 जून रोजी मैदानी आणि मध्य पर्वतीय भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर 15 ते 17 जूनपर्यंत संपूर्ण राज्यात हवामान निरभ्र राहण्याचा अंदाज आहे. 22 जून रोजी उत्तर प्रदेशात मान्सून दाखल होऊ शकतो, असे हवामान खात्याने म्हटले आहे. याआधी (Heat wave) कडक उन्हापासून दिलासा मिळण्याची शक्यता नाही.
उष्णतेपासून दिलासा नाही, कडक उन्हात दिल्लीत ऑरेंज अलर्ट
संपूर्ण भारतात भीषण उष्णता (Heat wave) कायम आहे. राजधानीत 11 जून ते 14 जून दरम्यान हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यावेळी उष्मा आणि उष्णतेच्या लाटेमुळे लोकांना घरातच राहावे लागले आहे. 14 जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेबाबत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यूपी आणि राजस्थानमध्येही कडाक्याच्या उन्हामुळे लोक त्रस्त झाले आहेत. उत्तर भारतातील मैदानी भागात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. यासोबतच (Heat stroke) उष्णतेच्या लाटेमुळे लोकांच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान, दिल्लीमध्ये तीव्र उष्णता कायम राहणार आहे. काही ठिकाणी पारा 45अंश सेल्सिअसच्या पुढे जाऊ शकतो.
दिल्लीत उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट
हवामान खात्याने (Weather Department) दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत आज पारा 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकतो. तर काही भागात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. उष्णतेची तीव्र लाट लक्षात घेता काही भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्यानुसार, दिल्लीत (Heat stroke) उष्णतेची लाट कायम राहणार आहे. या पार्श्वभूमीवर 12 जून रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 14-17 जूनसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
बिहार उत्तर प्रदेश झारखंडमध्ये उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट
राजधानीत 43.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 13 ते 17 जून दरम्यान तापमानाचा पारा 43 ते 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकतो, असे (Weather Department) हवामान खात्याचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत लोकांनी आरोग्याची काळजी घ्यावी आणि उन्हात बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. हिमाचल प्रदेशच्या मैदानी भागात आजपासून पुन्हा एकदा उष्णतेची लाट येऊ शकते. या पार्श्वभूमीवर (Weather Alert) हवामान खात्याने येथे यलो अलर्ट जारी केला आहे. 17 जूनपर्यंत राज्यात मान्सूनपूर्व आगमन अपेक्षित असून, त्यानंतरच (Heat stroke) उष्णतेच्या लाटेपासून लोकांना दिलासा मिळू शकेल, असे हवामान खात्याचे म्हणणे आहे.