नवी दिल्ली (Weather Report Today) : यावेळी दक्षिण-पश्चिम मान्सून (weather rain) देशातील अनेक राज्यांमध्ये दाखल झाला असून, सध्या दक्षिण विभागात अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. 20 ते 25 जून दरम्यान उत्तर प्रदेशसह उत्तर भारतात मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज (Weather Forecast) हवामान विभागाने वर्तविला आहे. उत्तर भारतातील राज्यांमध्ये उष्णतेची लाट कायम असून, पश्चिम बंगालमध्ये (Heavy Rain) अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. येत्या 4-5 दिवसांत पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि ईशान्य भारतात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
येथे CLICK करा: महाराष्ट्रातही मुसळधार पावसाचा इशारा
गेल्या आठवड्यात महाराष्ट्र आणि गोव्याच्या काही भागात जोरदार पाऊस (Heavy Rain) झाला. पश्चिम बंगालमध्येही पावसाने हजेरी लावली असून, त्यामुळे तिस्ता नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. सिक्कीममध्ये भूस्खलनामुळे एकाचा मृत्यू झाला तर पाच जण बेपत्ता झाले. बिहार आणि झारखंडमध्ये 13 ते 15 जून दरम्यान उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. 13-17 जून दरम्यान दिल्ली, हरियाणा, चंदीगड आणि पंजाबच्या काही भागात (Heat Wave) उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे 16-17 जून रोजी काही भागात परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.
VIDEO | Here’s what IMD scientist Soma Sen Roy said on heatwave conditions prevailing in several states in north India.
“The heatwave condition is prevailing in North India. Westerlies winds are blowing along the northern belt due to which there is heatwave to severe heatwave… pic.twitter.com/W4PODYLB1B
— Press Trust of India (@PTI_News) June 14, 2024
दिल्ली-एनसीआरमध्ये उष्णतेच्या लाटेपासून दिलासा नाही
संपूर्ण देशात कडक उष्मा कायम आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब आणि चंदीगडमध्ये येत्या 4-5 दिवसांत कोणताही दिलासा मिळण्याची शक्यता नाही. पुढील चार ते पाच दिवस उत्तर भारतात तीव्र उष्मा आणि उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचे, (Weather Forecast) हवामान विभागाने सांगितले आहे. उत्तर प्रदेश, राजस्थानसह राजधानीतही उष्णतेत वाढ होत आहे. हवामान विभागाने उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार आणि झारखंडच्या काही भागांमध्ये पुढील 3-4 दिवसांत उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे. त्याचप्रमाणे पंजाब, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्येही (Heat Wave) उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिली मोठी माहिती
येत्या काही दिवसांत दिल्लीमध्ये पारा घसरण्याची शक्यता नाही. या आठवड्यातही पारा घसरण्याची शक्यता नाही. दिल्ली-एनसीआरमध्ये कमाल तापमान 45-47 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. उत्तर प्रदेश, पंजाब, चंदीगड, झारखंड, हरियाणा, राजस्थानमध्ये पारा 45 ते 47 अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदवला गेला आहे. कानपूरमध्ये पारा 47.5.५ अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. 13 ते 17 तारखेदरम्यान उत्तर प्रदेशात जोरदार उष्णतेची लाट (Heat Wave) आणि उष्णतेची लाट राहील, असे (Weather Forecast) हवामान विभागाने सांगितले आहे.