नवी दिल्ली/ मुंबई (Weather Report) : आज मुंबई आणि महाराष्ट्राच्या काही भागात मेघगर्जनेसह (weather rain) मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने जारी केला आहे. मुंबईत दोन दिवसांपूर्वी मान्सून दाखल झाला आहे. कोकण, गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्र, कर्नाटकात मुसळधार पावसाची (heavy rain) शक्यता आहे. हवामान खात्याने या भागातही आज ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबई आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पाणी साचले असून, त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे.
येथे CLICK करा: कुठे मुसळधार पाऊस अन् कुठे कडक उष्मा
मुंबईसह ठाणे शहरातील अनेक भागात पाऊस
आज महाराष्ट्रातील अनेक भागात पाऊस (weather rain) पडण्याची शक्यता आहे. तसेच पंजाब, हरियाणा, यूपी, मध्य प्रदेशातील लोकांना (Heat Weather) उष्णतेपासून दिलासा मिळणार नाही. राजधानीत उष्णतेमुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सध्या हवामान विभागाकडून उष्णतेपासून दिलासा मिळताना दिसत नाही. काल सोमवारी दिल्लीचे तापमान 46 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले होते.
#WATCH महाराष्ट्र: ठाणे शहर के कई हिस्सों में बारिश हुई। pic.twitter.com/OgTkUVCp27
— ANI_HindiNews (@AHindinews) June 11, 2024
सोमवारी दिल्लीत 43.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नरेला येथे पारा सर्वाधिक असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. येथील पारा 46.6 अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. नजफगडमध्ये ते 46.3 अंश सेल्सिअसवर पोहोचले. दिल्लीत हवामान खात्याने (Orange Alert) ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दिल्लीत आज कमाल तापमान 44 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून, किमान तापमान 30 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
संपूर्ण भारतात कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. राजधानीत कमाल तापमान 43.4 अंश सेल्सिअस नोंदवले असून, आजही ते 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. दक्षिण भारतात (weather rain) मान्सून सक्रिय झाला असून, त्यामुळे केरळ, कर्नाटक आणि किनारपट्टी तमिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस (heavy rain) पडत आहे.