नवीन दिल्ली/मुंबई (Weather Today) : उत्तर भारतातील उष्णतेच्या पार्श्वभूमीवर (Weather Forecast) हवामान खात्याने दिलासा दिला आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये पुढील 5 दिवस ढगांच्या गडगडाटासह पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, दिल्ली एनसीआर देखील अंशतः ढगाळ राहील आणि काही ठिकाणी हलक्या रिमझिम पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने 10 जिल्ह्यांमध्ये जोरदार वादळ आणि (Heavy rainfall) पावसाचा इशारा दिला आहे. देशात मान्सून वेगाने पुढे जात असल्याची माहिती (Rain weather) हवामान खात्याने दिली आहे. येत्या 2 ते 3 दिवसांत मुंबई आणि तेलंगणासह महाराष्ट्रातील इतर काही भागात मान्सून पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे.
येथे CLICK करा: विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस; येलो अलर्ट
#WATCH | Maharashtra: Several parts of Mumbai face waterlogging as the city receives rainfall.
Visuals from Dahisar area. pic.twitter.com/WWuKZAL0jZ
— ANI (@ANI) June 9, 2024
मुंबईत पाऊस, IMD अलर्ट जारी
मुंबईतील पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचले आहे. (Rain weather) हवामान खात्याने यापूर्वीच येथे सतर्कतेचा इशारा दिला होता. पुढील 5 दिवसांत मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे. उत्तर-पश्चिम भारतात पुन्हा उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच येथे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सिंधुदुर्गमध्ये रेड अलर्ट जारी
येत्या 3 ते 4 तासात मुंबई, ठाणे, रायगड आणि सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पाऊस (Heavy rainfall) पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने मुंबई, ठाणे, रायगडमध्ये ऑरेंज अलर्ट तर सिंधुदुर्गात रेड अलर्ट (red alert) जारी केला आहे.