नवी दिल्ली (New Delhi) : देशभरात तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. (Meteorology Department) हवामान विभागाने अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातील ठाणे, रायगड आणि मुंबईत उष्णतेची लाट येण्याची भीती विभागाने व्यक्त केली आहे. माहितीनुसार, 27 एप्रिल ते 29 एप्रिल दरम्यान मुंबईच्या अनेक भागांसह ठाणे आणि रायगडमध्ये उष्णतेची लाट (Heat warning) येण्याची शक्यता आहे. यासोबतच आज दिल्लीत कमाल तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. दक्षिण पश्चिम बंगालमध्ये 30 एप्रिलपर्यंत उष्णतेच्या लाटेमुळे सामान्य जनजीवन प्रभावित होणार शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. पुरेसे पाणी प्यावे, सुती कपडे वापरावेत आणि उन्हात बाहेर जाताना डोके झाकून ठेवावे, लोकांना जास्त वेळ उन्हात न राहण्याचा सल्ला IMD ने दिला आहे.
महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा
याशिवाय (Maharashtra) महाराष्ट्रातील लोकांना उष्णतेची लाट टाळण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. 27 ते 29 एप्रिल दरम्यान ठाणे, रायगड आणि मुंबईच्या अनेक भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. 27 आणि 28 तारखेला तापमान खूप जास्त राहू शकते. विशेष म्हणजे मुंबई आणि परिसरात (Heat wave) उष्णतेच्या लाटेबाबत जारी करण्यात आलेला हा दुसरा इशारा आहे.
दिल्लीत पारा 40 अंशांपर्यंत
दिल्लीच्या हवामानाबाबत (Meteorology Department) हवामान खात्यानुसार, किमान पारा 21.6 अंश सेल्सिअस होता. आज शनिवारी कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत राहील, असे विभागाचे म्हणणे आहे. यासोबतच अंशत: ढगाळ वातावरण आणि वारेही वाहू शकतात, असे विभागाने सांगितले आहे.
पश्चिम बंगालमध्येही परिस्थिती कठीण
पश्चिम बंगालबाबतही (Meteorology Department) हवामान खात्याकडून इशारा देण्यात आला आहे. दक्षिण पश्चिम बंगालमध्ये 30 एप्रिलपर्यंत उष्णतेच्या लाटेमुळे सामान्य जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातील कलाईनकुंडा येथे 44.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. जे सामान्यपेक्षा 7.9 अंश सेल्सिअस जास्त आहे. कोलकात्यात कमाल तापमान 39.7 अंश सेल्सिअसपर्यंत राहू शकते. पुढील पाच दिवस येथे (Heat wave) उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.