चिखली (Buldhana):- चंद्रपूर येथे लग्न सोहळा आटोपून समृध्दी हायवे वरुण बुलढाणा कडे येत असतांनाही मेहकर फाट्यावर गाडी मध्ये डिझेल भरले आणि अचानक चालकाला गाडीच्या वायरिंग(wiring) पेट घेतल्याचे समजले. त्यामुळे गाडीतील सर्व वऱ्हाड मंडळी गाडी खाली उतरविले आणि काही वेळातच संपूर्ण लक्झरी बसचा कोळसा झाला.
घटना २५ जून रोजी सकाळी ४ वाजेच्या दरम्यान मेहकर फाट्यावर घडली
सविस्तर असे की बुलढाणा येथील अरुण राठोड यांच्या मुलाचे लग्न चंद्रपूर(Chandrapur) येथे होते त्यामुळे अरुण राठोड यांनी यात्रा खाजगी लक्झरी बस क्र. एम एच ०४ जी पी ८००८ ही भाड्याने घेवून चंद्रपूर येथे गेले होते. लग्न सोहळा(wedding ceremony) आटोपून समृध्दी हायवे (Samruddhi Highway) रोडने येत होते आणि बुलढाणा कडे परत यायचे म्हणून चालक विलास पवार यांनी समृध्दी हायवे रोडवरील मेहकर वरुण खाली उतरले आणि बुलढाणा येत असतांना मेहकर फाट्यावरील पेट्रोल पंपावर(Petrol pump) गाडीमध्ये डिझेल भरले. गाडी चालू करताच वायरिंग झाळाल्याचा वास येवू लागला. हे चालकाच्या लक्षात येताच चालकाने गाडीतील सर्व वऱ्हाडी मंडळी खाली उतरविले असता काही क्षणातच संपूर्ण गाडीने पेट घेतला त्यामध्ये लक्झरी बसचा कोळसा झाला. मात्र या घटनेत बस चालक विलास राठोड यांच्या सतर्कतेमुळे सर्वांचे प्राण वाचले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली असता घटनास्थळी धाव घेवून घटनेचा पंचनामा केला. परंतु वृत्त लीहेपर्यत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता .