जनसेवा कार्यालयाचे थाटात उद्घाटन
हिंगोली (Ramdas Patil Sumthankar) : विधानसभेतील जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी भाजपा नेते रामदास पाटील सुमठाणकर यांच्या संपर्क कार्यालयाचा लोकार्पण सोहळा रविवारी मोठ्या थाटात पार पडला. या निमित्ताने हभप कीर्तनकार सोपान महाराज सानप शास्त्री यांच्या मधुर कीर्तन झाले. यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. हिंगोली विधानसभा आणि जिल्ह्यातील नागरिकांना समस्यांच्या समाधानाला एक सशक्त व्यासपीठ मिळणार आहे. ज्यातून नागरिकांच्या अनेक समस्या, प्रश्न मांडण्यासाठी एक हक्काची जागा असणार आहे.
या कार्यालयातून शासनाच्या अनेक योजना,ज् याची परिपूर्ण माहिती या जनसेवा कार्यालयातून जनतेला दिली जाणार आहे. हे कार्यालय जनतेसाठी हे कार्यालय २४ तास उघडे असणार आहे. अशी माहिती रामदास पाटील सुमठाणकर (Ramdas Patil Sumthankar) यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. सामान्य माणसाला प्रश्न मांडण्यासाठी एक हक्काची जागा असावी या उद्देशाने मी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने तुम्हाला हक्काची जागा उपलब्ध करून देत आहे. जनसेवा कार्यालय सदैव उघडे असणार आहे.
यातून गरीब, शेतकरी, महिला आणि युवा वर्गासाठी हिंगोली मधील जनतेसाठी एक नवीन पर्वाची सुरुवात होत आहे. सामान्य जनतेच्या समस्यांना जलद आणि प्रभावी उत्तर मिळवण्यासाठी या कार्यालयाच्या माध्यमांतून तातडीने पावले उचलली जातील असा विश्वास रामदास पाटील (Ramdas Patil Sumthankar) यांनी दिला. उद्घाटन प्रसंगी अनेक ज्येष्ठ मंडळी, पदाधिकारी, महिला , पत्रकार, व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.