स्व. माणिकराव घवळे स्मृती राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा
वर्ध्याच्या आयपर महाविद्यालयास सांघिक विजेतेपद
पूर्वा केवटी, श्रेया सिंग ठाकूर, रितेश तिवारी वैयक्तिक पुरस्काराचे मानकरी
अमरावती (State Debate Competition) : शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या कल्याणकारी योजना ह्या लोकहिताच्या आहे. मात्र राजकीय स्वार्थापोटी दिल्या जाणाऱ्या लाभाच्या योजना ह्या लोकशाहीत घातक आहे या मताशी मी ठाम आहे, असे प्रतिपादन खासदार बळवंत वानखडे यांनी केले. स्व. माणिकराव घवळे (State Debate Competition) राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते.
राजकीय स्वार्थासाठी दिल्या जाणाऱ्या योजना लोकशाहीस घातक आहेत. या ज्वलंत विषयावर रंगलेल्या स्व. माणिकराव घवळे स्मृती राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेत यावर्षी वर्धा येथील औषध निर्माण शास्त्र शिक्षण व संशोधन संस्था (आयपर) या संघाने सांघिक विजेतेपद पटकावले. स्पर्धकांच्या उस्फुर्त प्रतिसादात पार पडलेल्या या स्पर्धेचा प्रेक्षकांनी वैचारिक लाभ घेतला. (State Debate Competition) बक्षीस वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. गजानन पुंडकर तर प्रमुख पाहुणे म्हणून विदर्भ युथ वेल्फेअर सोसायटीचे कोषाध्यक्ष प्रा. डॉ. हेमंत देशमुख यांची उपस्थिती होती.
यावेळी विचार पिठावर स्पर्धेचे अध्यक्ष अतुल गायगोले, डॉ. अविनाश चौधरी, प्राचार्य डॉ. वर्षा देशमुख यांची उपस्थिती होती. स्पर्धेचे परीक्षण पुणे येथील आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे प्रा. डॉ. पांडुरंग कंद, नागपूर येथील लोकसत्ता चे पत्रकार देवेश गोंडाणे, ब्रजलाल बियाणी महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. मृणाल महाजन आणि साहित्यिक अमोल सावरकर यांनी केले.
या (State Debate Competition) स्पर्धेमध्ये वर्धा येथील आयपर महाविद्यालयाच्या श्रेया ठाकरे व राधा भावरकर या दोघींच्या संघाने यावर्षीचा सांघिक पुरस्कार पटकाविला. त्यांना फिरता चषक, रोख 11 हजार रुपयांचे पारितोषिक, व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तर वैयक्तिक गटात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेच्या पूर्वा केवटी, हिला रोख रक्कम 7000 प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. द्वितीय पुरस्कार सिपना इंजिनिअरिंग कॉलेज येथील श्रेया सिंग ठाकूर हिला रोख रक्कम 5000 प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
नागपूर येथील इग्नू विद्यापीठाचा रितेश तिवारी याला रोख रक्कम 3000 प्रमाणपत्र व चिन्हासह तृतीय पुरस्काराने सन्मानित करण्यातआले. शिवाजी शिक्षण महाविद्यालयाच्या वैष्णवी सानप या विद्यार्थिनीने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले तिला रोख रक्कम 2000 प्रमाणपत्र देऊन मान्यवरांनी सन्मानित केले. बुलढाणा येथील माजी न्यायाधीश स्व. रमेश दिनोदे स्मरणार्थ विशेष उत्तेजनार्थ पुरस्कार गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाचा तुषार बुधबावरे याला देण्यात आले. बक्षीस वितरण समारंभाचे प्रास्ताविक संयोजक प्रफुल्ल घवळे, संचालन मयूर चौधरी व आभार प्रदर्शन वैशाली गरकल यांनी केले.
कार्यक्रमाच्या (State Debate Competition) यशस्वीतेकरिता प्रा. डॉ. अमित गावंडे, प्रा. डॉ. शितलबाबू तायडे, संदीप मुर्ताडकर, गौरव इंगळे, प्रा. रत्नाकर शिरसाट, रवींद्र घवळे, तसेच डॉ.पंजाबराव देशमुख विधि महाविद्यालय येथील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय आणि स्व. माणिकराव घवळे स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेत सत्तरून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला.राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या स्पर्धकांनी आपली अभ्यासपूर्ण मते व विचार मांडून सभागृह दणाणून सोडले.