अमरावती (Maharashtra Gaurav Award) : अमरावती जिल्हा येथील सुप्रसिद्ध गायिका कुमारी जयश्री सोलंके यांचे नागपूर येथे महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्राची उप राजधानी व संपूर्ण भारतात संत्रा नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या नागपूर येथे जागृती फाऊंडेशन व मौर्यन डान्स अकॅडमी नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने (Maharashtra Gaurav Award) महाराष्ट्र गौरव पुरस्कार व भारतीय वेशभूषा स्पर्धा व लावणी रंगारंग अश्या विविध कलागुणांचे सादरीकरण होणार होते.
सादर कार्यक्रमाला श्री मंगलमूर्ती बिल्डकॉनचे मनोज जी कुंभारे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य मा. गजानन जी जोशी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते व सदर कार्यक्रम हा प्रसिद्ध लावणी क्विन शिल्पा शाहीर यांनी आयोजित केला होता. (Maharashtra Gaurav Award) सदर कार्यक्रम सुरेश भट सभागृह रेशिमबाग ग्राउंड नागपूर येथे दिनांक २३ सप्टेंबर २०२४ रोजी आयोजित करण्यात आला होता.