Nagpur Elections:- दक्षिण नागपूर मतदार संघाचे आमदार असतांना सुधाकर कोहळे (Sudhakar Kohale) यांच्यावर घराजवळील एक मोकळा भूखंड लाटल्याचा आरोप झाला होता. याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी (Hudkeshwar Police)त्यांच्याविरुद्ध गुन्हा देखील दाखल केला होता. दरम्यान तक्रारकर्त्याचे वकील अॅड. तरुण परमार यांनी पत्रकार परिषद घेऊन भूखंड घोटाळ्याचा आरोप केला होता. यानंतर राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली होती.
भूखंड घोटाळ्याचा आरोप; राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ
त्यामुळे पुढील निवडणुकीत पक्षाने कोहळे यांची तिकीट कापले होते, शेवटी दुखावलेल्या कोहळे यांनी अॅड. तरुण परमार यांची बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅन्ड गोवा हायकोर्ट बॉम्बे मुंबईकडे तक्रार केली होती. या तक्रारीत त्यांनी अॅड. परमार यांच्या आरोपामुळे पक्षाने तिकीट कापल्याचा, एवढेच नव्हे पक्षाच्या शहर अध्यक्ष पदावरुन हटविल्याचा आरोप केला होता. दक्षिण नागपूरातील जानकीनगर येथे राहणारे सुधाकर कोहळे यांना पक्षाने वर्ष २०१४ मध्ये तिकीट दिले होते. पक्षाच्या संघटन बांधणीसह पदाधिकारी व कार्यकर्त्याच्या मेहनतीमुळे कोहळे यांचा निवडणूकीत ८१,२२४ मतांनी विजय झाला होता. त्यांच्या खांद्यावर पक्षाने शहर अध्यक्ष पदाचीही जबाबदारी सोपविली होती. दरम्यान ते नासुप्रचे ट्रस्टी सुद्धा होते.
भूखंड घोटाळयामुळे २०१९ मधे कापली होती तिकीट..!
या दरम्यान एका सामाजिक कार्यकर्त्याने त्यांच्यावर भूखंड घोटाळ्याचा आरोप केला होता. याविरुद्ध हुडकेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार देखील केली होती. हे प्रकरण नंतर न्यायालयात गेले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर चौकशीअंती एक एक करीत आरोपींवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. यामध्ये तत्कालीन आमदार सुधाकर कोहळे यांच्यावर सुद्धा गुन्हा (Crime)दाखल करण्यात आला होता. दरम्यान तक्रारकर्ते सामाजिक कार्यकर्त्याचे वकील अॅड. तरुण परमार यांनी पत्रकार परिषद घेऊन भूखंड घोटाळ्याचा आरोप केला होता. जानकीनगर येथील घराजवळील केवळ १ हजार स्केअर एकूण क्षेत्रफळ असलेला मोकळ्या जागेचे हे प्रकरण होते. याबाबतचे वृत्त काही वृत्तपत्रात प्रकाशीत झाले होते. त्यामुळे कोहळे यांनी अॅड. तरुण परमार यांची बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅन्ड गोवा हायकोर्ट (Goa High Court) बॉम्बे मुंबईकडे तक्रार केली होती.
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्रकडे केलेल्या तक्रारीतून झाला खुलासा
तक्रारीत त्यांनी पक्षाने आपल्याला अॅड. परमार यांच्या आरोपीमुळे वर्ष २०१९ च्या विधानसभेचे तिकीट दिले नसल्याचे, तसेच पक्षच्या शहर अध्यक्ष पदावरुन हटविल्याचा उल्लेख केला होता. खोट्या बातम्या प्रकाशीत करुन माझी बदनामी आणि नुकसान करण्यासाठी हेतुपुरस्सर केल्याचे कोहळे यांनी तक्रारीत म्हटले होते.