मानोरा (Washim) :- तालुक्यातील बोरव्हा येथील शेतकरी डॉ ओंकार राठोड यांच्या शेतातील पाच एकर मधील दिड एकर गहू विद्युत रोहित्राच्या शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक झाले. त्यामुळे आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
दिड एकर गहू विद्युत रोहित्राच्या शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक
सविस्तर असे की, बोरव्हा शिवारातील गट नंबर १४/२ मध्ये शेतकरी डॉ राठोड यांनी रब्बी हंगामात शेतात पाच एकर गहूची पेरणी केली होती. गावाला लागूनच असलेल्या शेतात विद्युत रोहित्र बसविण्यात आले आहे. विद्युत रोहित्राच्या शॉर्ट सर्किटमुळे (short circuit) मंगळवारी सायंकाळच्या सुमारास शेतातील गव्हाला आग लागली. आजूबाजूच्या शेतात असलेल्या शेतकऱ्यांना गव्हाला आग लागल्याची चाहूल लागताच शेतकरी बादल पवार व दत्ता पवार यांनी पाच एकरातील गव्हाला लागलेल्या आगीला (Fire) विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले असता त्यांना यश आले परंतु तोपर्यंत दिड एकर शेतातील गहू जळून खाक झाले होते. शेतकऱ्यांनी गहू पिकाचा विमा काढला असुन घटनास्थळी तलाठी यांनी पंचनामा पंचनामा केला असल्याची माहिती शेतकऱ्याकडून प्राप्त झाली आहे