परभणी(Parbhani) :- शहरातील वसमत रोडवर असलेल्या राजगोपालाचारी उद्यानाच्या विकासावर कोट्यावधी रुपयांचा खर्च होवूनही उद्यानाची बकाल अवस्था कायम आहे. विरंगुळ्यासाठी उद्यानात येणारे ज्येष्ठ नागरीक, लहाण मुले, तरुण यांच्यासाठी मनोरंजनाकरीता(Entertainment) आवश्यक सोयी – सुविधा नसल्याने नागरीकांचा हिरमोड होत आहे.
शहराची लोकसंख्या चार लाखांच्या वर पोहोचली
परभणी शहराची लोकसंख्या चार लाखांच्या वर पोहोचली आहे. शहरामध्ये शिवाजीपार्क, नेहरु पार्क, राजगोपालाचारी उद्यान, गांधी पार्क अशी उद्याने आहेत. यातील राजगोपालाचारी उद्यानात सायंकाळच्या वेळी फिरण्यासाठी येणार्या नागरीकांची संख्या अधिक आहे. उद्यानामध्ये (park) अपेक्षित सोयी – सुविधा नाहीत. उद्यानातील हिरवळ नाहिशी झाली असून उद्यानात येणार्या नागरीकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही गंभीर बनला आहे. मागील काही दिवसात या उद्यानामध्ये विविध विकासकामे (Development works) करण्यात आली. मात्र सद्यस्थितीत उद्यानाची बकाल अवस्था झाली असल्याचे दिसत आहे.
दोन कोटी रुपये खर्च करुन संगीत कारंजे आणि तिरंगा झेंड्याचे काम करण्यात आले
उद्यानातील जॉगींग ट्रॅक (jogging track) बांधकाम साहित्याचे व्यापला आहे. त्याच प्रमाणे जलकुंभासाठी लागणारे बांधकाम साहित्य देखील उद्यानातच टाकण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी जवळपास सव्वा दोन कोटी रुपये खर्च करुन संगीत कारंजे आणि तिरंगा झेंड्याचे काम करण्यात आले. हे काम १७ सप्टेंबर २०२३ ला पूर्ण झाले. सद्यस्थितीत कारंजे सुरू नाहीत. त्याच बरोबर उद्यानातील खांबाला झेंडा देखील नाही. या झेंड्याविषयी माहिती घेतली असता देखभालीसाठी झेंडा उतरविण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.
उद्यानात लहान मुलांसाठी असलेल्या खेळण्यांचीही दुरावस्था झाली आहे. पर्यटन विकास निधीतून खेळणी व इतर मनोरंजनात्मक बाबींसाठी जवळपास दिड कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. मात्र या प्रस्तावाचे पुढे काय झाले या विषयी अधिक माहिती मिळू शकली नाही.